नऊवारी नेसून पूर्ण केली मॅरेथॉन, महाराष्ट्राच्या क्रांतीने साकारला वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 05:32 PM2018-09-18T17:32:38+5:302018-09-18T17:32:56+5:30

महाराष्ट्राच्या क्रांती साळवी यांनी बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या बर्लिन मॅरेथॉन शर्यतीत पारंपारिक नऊवारी साडीत 42 किमीचे अंतर पार करून वेगळा विक्रम आपल्या नावे केला.

Maharashtra krani salvi has created Guiness World record by running berlin full marathon wearing 9 wari saree | नऊवारी नेसून पूर्ण केली मॅरेथॉन, महाराष्ट्राच्या क्रांतीने साकारला वर्ल्ड रेकॉर्ड

नऊवारी नेसून पूर्ण केली मॅरेथॉन, महाराष्ट्राच्या क्रांतीने साकारला वर्ल्ड रेकॉर्ड

googlenewsNext

बर्लिन : महाराष्ट्राच्या क्रांती साळवी यांनी बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या बर्लिन मॅरेथॉन शर्यतीत पारंपारिक नऊवारी साडीत 42 किमीचे अंतर पार करून वेगळा विक्रम आपल्या नावे केला. नऊवारी साडीत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्याच धावपटू ठरल्या. धुळ्याच्या क्रांतीने ३ तास ५७ मिनिटात संपूर्ण मॅरेथॉन (४२ किमी) पूर्ण केली. तिने पारंपारिक नऊवारी साडीत धावत गिनिज बूक मध्ये आपले नाव नोंदवले आहे.

View this post on Instagram


एस अॅथलेटिक्स क्लबच्या क्रांती यांनी महिलांच्या 50 वर्षांखालील गटात हा पराक्रम केला. त्यांनी पहिले पाच किलोमीटरचे अंतर 27 मिनिटे 21 सेकंदात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपला वेग वाढवताना 42 किमीचे अंतर  3 तास 57 मिनिटे 07 सेंकदात पार केले. वयोगटात त्या 182 व्या क्रमांकावर आल्या, तर संपूर्ण स्पर्धकांमध्ये त्यांचा 2536 क्रमांक आला. 

View this post on Instagram

Web Title: Maharashtra krani salvi has created Guiness World record by running berlin full marathon wearing 9 wari saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.