...तर ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळणार नाही, डेव्हिड वॉर्नर संतापला

By admin | Published: June 7, 2017 05:49 PM2017-06-07T17:49:11+5:302017-06-07T18:12:59+5:30

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टिमचा उपकर्णधार आणि सलामीचा धडाकेबाज खेळाडू डेव्हिड वॉर्नर याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बॉर्डावर (सीए) टीका केली आहे.

... not playing for Australia, David Warner furious | ...तर ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळणार नाही, डेव्हिड वॉर्नर संतापला

...तर ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळणार नाही, डेव्हिड वॉर्नर संतापला

Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 7 - ऑस्ट्रेलिया क्रिकेट टिमचा उपकर्णधार आणि सलामीचा धडाकेबाज खेळाडू डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बॉर्डावर (सीए) चांगलाच संतापला आहे. जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आम्हाला कोणता नवा कॉन्ट्रॅक्ट दिला नाही तर आम्ही ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळणार नाही असं वॉर्नर म्हणाला आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंमध्ये वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी, जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी 30 जूनपूर्वी नवी ऑफर स्वीकारली नाही तर आम्ही खेळाडूंना पैसे देणार नाही असं सीएने म्हटलं होतं. 
 
फेअरफॅक्स मीडियासोबत बोलताना वॉर्नर म्हणाला, जर आम्ही बेरोजगर झालो आमच्या काहीच काम नसलं तरीही आम्ही खेळणार नाही. सीएसोबतचा वाद लवकरच संपेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. तसेच आता आमचं पूर्ण लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे, सध्यातरी आम्ही इतर गोष्टींचा विचार करत नाहीये,  चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर या सर्व बाबींचा विचार केला जाईल, असं तो म्हणाला. 
 
काही दिवसांपूर्वीही, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण टीम संपावर जाईल असा इशारा वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला होता. त्यामुळे  क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंमध्ये सुरू झालेला हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: ... not playing for Australia, David Warner furious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.