रवीशास्त्रींच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते - गौतम गंभीर
By Admin | Published: June 30, 2016 05:28 PM2016-06-30T17:28:35+5:302016-06-30T17:28:35+5:30
कोच पदावरून भारताच्या दोन माजी कर्णधारांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात माजी कर्णधार बिशनसिंग बेदी नंतर भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने उडी घेतली आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 : कोच पदावरून भारताच्या दोन माजी कर्णधारांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात माजी कर्णधार बिशनसिंग बेदी नंतर भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने उडी घेतली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रवीशास्त्री यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. तो म्हणाला, रवीशास्त्री यांच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते. कुंबळे सर्वोत्कृष्ट पसंती असून ती कठोर मेहनत घेणारी व्यक्ती आहे.
माजी खेळाडू आणि सध्या समालोचक असलेला संजय मांजरेकर याने टिट्वटरवर मत मांडताना कुंबळेला पाठिंबा दिला. तो म्हणाला, माझ्यामते रवी कोचपदासाठी निवड न झाल्याने हताश आहे. हा त्याच्यासाठी नवा अनुभव असेल कारण बीसीसीआयने कोचपदी उत्कृष्ट व्यक्तीची निवड केली आहे. गंभीर याने रवी शास्त्रीच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत एकप्रकारे गांगुलीला पाठिंबा दर्शवला आहे.
अनिल कुंबळे मुख्य कोच बनल्यानंतर शास्त्री यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करीत वादाला तोंड फोडले होते. मी मुलाखत देत असताना तीन सदस्यीय पॅनलमधील सौरभ गांगुली याने अनुपस्थिती दर्शवीत माझा अपमान केल्याची भावना शास्त्रीने व्यक्त केली होती.
(शास्त्रींनी हवेत उड्या मारू नये, रागावलेल्या गांगुलीचा शाब्दिक वार)
कोचपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रीकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले होते. या मुद्याला फार महत्त्व न देता कुंबळे यांनी संघबांधणीत खेळाडू सर्वांत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. कोच बनल्यानंतर मी सर्वांत आधी रवी शास्त्री यांना फोन केला. त्यांच्या अनुभवाचा लाभ मला होणार आहे. भारतीय संघाने तिन्ही प्रकारात वर्चस्व गाजवावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे असे कुंबळेने स्पष्ट केले.