शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:06+5:302015-02-18T00:13:06+5:30
क्रीडा पुरस्कारांचा शिवजयंतीचा मुहूर्त चुकणार
Next
क रीडा पुरस्कारांचा शिवजयंतीचा मुहूर्त चुकणारनिवड समितीही नाही : १ मे रोजी पुरस्कार देण्याच्या हालचालीपुणे (विशाल शिर्के) : शिवजयंतीच्या दिवशी देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचा यंदाच्या शिवजयंतीचा मुहूर्त चुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रीडा विभागाने गेल्या दोन वर्षार्ंतील ३९२ पुरस्कारार्थ्यांची यादी सरकारला सादर केली. पण नाव निश्चितीसाठी राज्य सरकारने समिती न नेमल्याने निवड प्रक्रिया खोळंबली. आता कुठे समिती स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे पुरस्कार महाराष्ट्र दिनाला १ मे रोजी देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी शिवजयंती साजरी होत आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार शिवजयंतीला पुरस्कार वितरण करण्याचे निश्चित केले आहे. तथापि राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणांमुळे पुरस्कारांचे वितरण कधीही वेळेवर होत नाही, हा पूर्वानुभव आहे. क्रीडा विभागाने २०१२-१३ व २०१३-१४ अशी दोन वर्षांतील ३९२ व्यक्तींच्या नावाची शिफारस सरकारला केली. पण निवड समितीचा पत्ता नसल्याने नावांची छाननी करणार कोण?-----------शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांबाबत लवकरच क्रीडामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यात निवड समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच पुरस्कार वितरण १ मे रोजी होईल की त्यापूर्वी हा निर्णयदेखील बैठकीतच होईल. ओमप्रकाश बकोरिया, प्रभारी क्रीडा आयुक्त ------------------------क्रीडा पुरस्कार (२०१२-१३ व २०१३-१४)पुरस्काराचे नाव अर्ज संख्या-शिवछत्रपती पुरस्कार संघटक/कार्यकर्ते २०१२-१३ ३२ २०१३-१४ ३७-शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव १९-शिवछत्रपती राज्य पुरस्कारखेळाडू २०१२-१३ ३९ मुली व ३५ मुले २०१३-१४५४ मुली व ३९ मुले-एकलव्य क्रीडा पुरस्कारअपंग खेळाडू २०१२-१३ १६ २०१३-१४२१-क्रीडा मार्गदर्शक २०१२-१३ ३० २०१३-१४३३जिजामाता राज्य पुरस्कार २०१२-१३ ३ २०१३-१४ ३साहसी क्रीडा पुरस्कार २०१२-१३ १२ २०१३-१४ २०एकूण ३९२