सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान
By Admin | Published: August 29, 2016 01:00 PM2016-08-29T13:00:49+5:302016-08-29T13:05:47+5:30
पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणा-या पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजीव गांधी खेल रत्न हा भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. राष्ट्रपती भवनात सुरु असलेल्या या कार्यक्रमात खेल रत्न, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबरला राष्ट्रपतींनी अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.
यांना मिळाला खेलरत्न पुरस्कार
रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवणा-या साक्षी मलिकला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
नेमबाज जीतू रायला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
रिओ ऑलिम्पिकमध्ये वॉल्ट जिमनॅस्टीक्स प्रकारात चौथे स्थान मिळवणा-या दीपा कर्माकरला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या पी.व्ही.सिंधूला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
यांना मिळाला अर्जुन पुरस्कार
टेबलटेनिसपटू सौम्यजित घोष अर्जुन पुरस्काराने सन्मानित.
महिला नेमबाज अपूर्वी चंदेला अर्जुन पुरस्काराने सन्मानित.
नेमबाज गुरप्रीत सिंग अर्जुन पुरस्काराने सन्मानित.
भारतीय हॉकीपटू रघुनाथ वोक्कालिगा अर्जुन पुरस्कारने सन्मानित.
भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपालला अर्जुन पुरस्कार प्रदान.
फुटबॉलमध्ये सुब्रतो पॉललआ अर्जुन पुरस्कार प्रदान.
बॉक्सर शिव थापाला अर्जुन पुरस्कार प्रदान.
बिलियडर्स, स्नूकरसाठी सौरव कोठारीला अर्जुन पुरस्कार प्रदान.
धावपटू ललिता बाबरला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते २०१६ साठीचा अर्जुन पुरस्कार प्रदान.
रजत चौहानला अर्जुन पुरस्कार प्रदान.
यांना मिळाला द्रोणाचार्य पुरस्कार
कुस्ती प्रशिक्षक महावीर सिंग द्रोणाचार्य पुरस्कारने सन्मानित.
भारतीय जलतरण संघाचे प्रशिक्षक प्रदीप कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान.
दीपा कर्माकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांना द्रोणाचार्य पुरस्कार.
विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान.
नागापुरी रमेश यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते वर्ष २०१६ साठीच्या द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान.