क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिले कोहली, सायना आणि ऋतिक रोशन यांना हे चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 05:12 PM2018-05-22T17:12:31+5:302018-05-22T19:09:25+5:30
राठोड यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉलीवूडचा अभिनेता ऋतिक रोशन यांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे, काय आहे हे चॅलेंज ते आपण पाहूया.
नवी दिल्ली : भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी समाजमाध्यमांचा आधार घेतला आहे. राठोड यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉलीवूडचा अभिनेता ऋतिक रोशन यांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे, काय आहे हे चॅलेंज ते आपण पाहूया.
राठोड यांनी आपला एक व्हीडीओ बनवला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या कार्यालयातच पुश अप्स मारले आणि या व्हीडीओच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये तंदुरुस्तीबाबत जागृकता निर्माण करण्याचे काम केले आहे. यावेळी त्यांनी ' आपण फिट तर इंडिया फिट ' असा नाराही दिला आहे.
#HumFitTohIndiaFit 🇮🇳🏆
— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) May 22, 2018
Post pictures and videos of how you keep yourself fit and send a #FitnessChallenge to your friends on social media. Here's my video 😀and I challenge @iHrithik, @imVkohli & @NSaina to join in🥊 pic.twitter.com/pYhRY1lNEm
हा व्हीडीओ राठोड यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी कोहली, सायना आणि ऋतिक यांना नॉमिनेट केले आहे. देशातील लोकांचा फिटनेस वाढवायचा असेल तर तुम्हीही यामध्ये सामील व्हा, असे राठोड यांनी कोहली, सायना आणि ऋतिक यांना सांगितले आहे. त्यासाठीच राठोड यांनी या तिघांना चॅलेंज दिले आहे.