सुमित ठरला हिंदकेसरी

By admin | Published: May 1, 2017 01:41 AM2017-05-01T01:41:18+5:302017-05-01T01:41:18+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदकेसरी कुस्ती

Sumit became Hindkeshri | सुमित ठरला हिंदकेसरी

सुमित ठरला हिंदकेसरी

Next

- दिनेश गुंड -
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत किताबाच्या अंतिम लढतीत एनसीआरच्या सुमितने महाराष्ट्राच्या अभिजित कटकेला ९-२ गुणांनी पराभूत करून हिंदू केसरीची गदा आणि रोख अडीच लाख रुपये जिंकले. अभिजितला दीड लाखावर समाधान मानावे लागले.
विजेतेपदाच्या लढतीत सुमितने आपल्या आंतरराष्ट्रीयस्तराचा अनुभव पणाला लावत अभिजितला सुरुवातीपासून आक्रमणाची संधी न देता एकेरी पट, लपेट दस्ती ही डाव करीत आपले गुणांचे खाते पहिल्या फेरीतच ४-२ ने आघाडी घेऊन अभिजितच्या विजयाचा मार्ग खडतर करून ठेवला. दोघेही उंचीने सारखे असल्यामुळे अभिजितच्या डावांवर प्रतिडाव करीत सुमित दुसऱ्या फेरीतही सरस ठरला. अभिजितने दिलेली चिवट झुंज तितकाच प्रतिकार करीत सुमितने मोडून काढली. ७-७ मिनिटांच्या दोन फेऱ्या अखेर सुमित ९-२ गुणांनी हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला.
तत्पूर्वी, अखंड परंपरा जमलेल्या भारत देशाच्या लाल मातीचा सर्वोत्तम किताब हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेला आज अंतिम फेरीच्या लढतीसाठी पुणे जिल्ह्यातील कुस्तीशौकिनांनी ४ वाजल्यापासूनच हजेरी लावण्यास प्रारंभ केला आणि पाहता पाहता मैदान गर्दीने फुलून गेले. पहिल्या उपांत्यफेरीच्या लढतीत सुरुवातीपासूनच क्रिशन आक्रमक होता. एका पाठोपाठ एक आक्रमण करत एकेरीपट आणि दुहेरीपट डाव करत क्रिशनने पहिल्या फेरीत ५ गुण वसूल गेले. दुसऱ्या फेरीत जोगिंदरने आपले हुकमी अस्त्र टांग डावाचा केलेला प्रयत्न क्रिशनने उधळून लावत ही लढत ७-१ गुणांच्या फरकाने जिंकली.
दुसऱ्या उपांत्यफेरीच्या लढतीत महाराष्ट्राचे आशास्थान असलेल्या अभिजित कटके आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रचंड अनुभव असलेल्या एनसीआरच्या सुमितकडून ६-१ गुणांवर पराभूत झाला.
क्रॉस उपांत्यफेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटकेने अतिशय प्रेक्षणीय लढतीत रेल्वेच्या क्रिशनला ८-३ पराभूत करून स्पर्धेत आपले पुनरागमन तर केलेच, परंतु रोमांचक लढतीत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. क्रिशनच्या मार्गदर्शकाने पंचाच्या निर्णयावर  अपिल केले. परंतु ज्युरी कृपाशंकर यांनी पंचाचा निर्णय योग्य, असे निर्णय जाहीर केले. अभिजितने लावलेली ढाक त्याला विजयी करून गेली.

Web Title: Sumit became Hindkeshri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.