ऑस्ट्रेलिया बरोबरच्या वादावर कोणतीही खंत नाही - विराट कोहली

By admin | Published: March 15, 2017 02:37 PM2017-03-15T14:37:03+5:302017-03-15T18:31:47+5:30

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दीक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. 2008 सालच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंडसमध्ये घडलेले..

There is no doubt about the deal with Australia - Virat Kohli | ऑस्ट्रेलिया बरोबरच्या वादावर कोणतीही खंत नाही - विराट कोहली

ऑस्ट्रेलिया बरोबरच्या वादावर कोणतीही खंत नाही - विराट कोहली

Next

 ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. 15 - भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दीक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. 2008 सालच्या  ऑस्ट्रेलिया दौ-यात हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंडसमध्ये घडलेले मंकीगेट प्रकरण आजही अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजे आहे. दुस-या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डीआरएसच्या वापरावरुन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथवर केलेल्या गंभीर आरोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे. 

दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तणाव वाढला आहे. विराट कोहलीने स्टीव्ह स्मिथ बरोबरच्या शाब्दीक लढाईबद्दल अजिबात खंत वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. उद्यापासून रांचीमध्ये सुरु होणा-या तिस-या कसोटीपूर्वी पत्रकारांशी बोलताना कोहलीने आपण सर्व लक्ष क्रिकेटवर केंद्रीत केल्याचे सांगितले. पण स्मिथवर केलेले आरोप मागे घेण्यास नकार दिला. 
 
मी जे बोललो त्याबद्दल अजिबात खंत वाटत नाही पण त्याचवेळी पुन्हा तशीच कृती करण्याचा मूर्खपणा करु नये असे कोहली म्हणाला. दुस-या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथला पंचांनी बाद ठरवल्यानंतर त्याने डीआरएसचा कौल घेण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे पाहून  विचारणा केली होती. त्यावर सामना संपल्यानंतर कोहलीने जोरदार टीका केली होती. 
 
दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी भारतीय खेळाडूंच्या आक्रमकतेला लगाम घालणार नसल्याचे म्हटले आहे.  जर खेळाडू मैदानात अपेक्षित असलेली कामगिरी करीत असतील, तर त्यांच्या नैसर्गिक खेळाला रोखण्याचा मी प्रयत्न करणार नाही. आपल्याला आक्रमकतेवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची स्वत:ची एक शैली असते असे कुंबळे म्हणाले. 
 
दुसऱ्या कसोटी सामन्यात डीआरएस पर्याय वापरण्यावरून मोठा गोंधळ उडाला होता. ऑसी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय यांनी संयुक्तपणे या प्रकरणावर पडदा टाकला, याविषयी कुंबळे म्हणाले, ‘‘क्रिकेट या महान खेळाचा संरक्षक म्हणून आमची सर्वांची ही जबाबदारी आहे, की अशा प्रकारची प्रकरणे योग्यरीतीने हाताळणे. या खेळाचे मुख्य हितधारक खेळाडू असून त्यांना आपल्यावरील जबाबदारीची जाणीव असावी.’’ 
 
 

Web Title: There is no doubt about the deal with Australia - Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.