...‘त्याशिवाय’ पर्याय नव्हता, वादविवाद तर माझ्या पुढे-मागेच - सुशील कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 02:45 AM2017-11-19T02:45:03+5:302017-11-19T02:45:12+5:30
आॅलिम्पिक स्पर्धेत दोन वेळेस पदक जिंकणा-या सुशील कुमार याला येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या ७४ किलो वजनाच्या फ्री स्टाईल गटातील उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी मल्लांनी माघार घेण्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
इंदौर : आॅलिम्पिक स्पर्धेत दोन वेळेस पदक जिंकणा-या सुशील कुमार याला येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या ७४ किलो वजनाच्या फ्री स्टाईल गटातील उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी मल्लांनी माघार घेण्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे; परंतु तीन महत्त्वपूर्ण लढतीत प्रतिस्पर्धी पहिलवानांनी न लढता माघार घेतल्यानंतर विजय मान्य करण्याशिवाय आपण काय करू शकलो असतो, अशी प्रतिक्रिया तीन वर्षांनंतर मॅटवर पुनरागमन केल्यानंतर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणा-या सुशील कुमारने व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना सुशील म्हणाला, ‘‘जर समोरचा पहिलवान माझ्याशी कुस्ती खेळण्यास तयार नव्हता अशा परिस्थितीत मी काय करू शकतो.’’ तिन्ही लढतींत माघार घेणाºया पहिलवान वॉकओव्हरकडे सन्मानाच्या दृष्टीने पाहत होते काय? या प्रश्नावर रेल्वेच्या विजेत्या पहिलवानाने उत्तर दिले. तो म्हणाला, ‘‘सर्वच पहिलवान आपल्या वरिष्ठ खेळाडूंचा सन्मान करतात; मात्र मॅटवरील लढतीदरम्यान सर्वच पहिलवान एकसारखे असतात. .’’
पहिलवानांच्या माघारीविषयी शंकेविषयी विचारल्यानंतर तो शांतचित्ताने म्हणाला, ‘‘वादविवाद तर माझ्या पुढे-मागेच असतात.’’ वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेंट (डब्ल्यूडब्ल्यूई)मध्ये पदार्पणाची सध्या तरी योजना नसल्याचेही सुशीलने स्पष्ट केले.
सुशील म्हणाला, ‘‘डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये अनेक बाबी या माझ्या नैसर्गिक खेळानुसार नाही. मी फ्री स्टाईल कुस्तीत पुन्हा एकदा देशाचे प्रतिनिधित्व करू इच्छितो.’’ भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने सुशीलवर बायोपिक बनवली जावी असे म्हटले होते. याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘सेहवाग माझे मोठे बंधू आहेत. मला नेहमीच त्यांचा आशीर्वाद मिळत असतो.