"या" कारणामुळे युवराज सिंग ट्रेनिंग सेशनला गैरहजर

By admin | Published: May 27, 2017 03:36 PM2017-05-27T15:36:13+5:302017-05-27T15:36:13+5:30

लॉडर्सवरील दोन तासाच्या ट्रेनिंग सेशनला युवराज अनुपस्थित होता. रविवारी ओव्हलच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंडमध्ये सराव सामना होणार आहे.

Yuvraj Singh training session absent for "this" reason | "या" कारणामुळे युवराज सिंग ट्रेनिंग सेशनला गैरहजर

"या" कारणामुळे युवराज सिंग ट्रेनिंग सेशनला गैरहजर

Next

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 27 - टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज युवराज सिंग सध्या आजारी आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाची धाकधूक थोडी वाढली आहे. आजारी असल्या कारणाने शुक्रवारी लॉडर्सवरील दोन तासाच्या ट्रेनिंग सेशनला युवराज अनुपस्थित होता. रविवारी ओव्हलच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंडमध्ये सराव सामना होणार आहे. 4 जूनला एजबॅस्टनवर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या  सामन्याने भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. 
 
तापामुळे युवराज सिंह ट्रेनिंग सेशनला गैरहजर राहिल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. एक-दोन दिवसात युवराज फिट होईल अशी संघ व्यवस्थापनाला अपेक्षा आहे. युवराज सिंग सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने आयपीएलच्या या मोसमात 12 सामन्यात 252 धावा केल्या आहेत तसेच त्याआधी इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शतक झळकवून भारताच्या विजयाची महत्वाची भूमिका बजावली होती. 
 
कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की भारताचा मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग तब्बल 11 वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळत आहे. 2007 आणि 2011 मध्ये भारताने जिंकलेल्या आयसीसी विश्वचषकात युवराज सिंगचे मोलाचे योगदान होते. गतविजेत्या भारतीय संघात युवराजची वर्णी लागली नव्हती. केनियात 2002 मध्ये झालेल्या स्पर्धेद्वारे पदार्पण करणाऱ्या युवीने 2006 पर्यंतच्या सर्वच स्पर्धेत भाग घेतला. 
 
2009 आणि 2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत युवराज सिंगची निवड झालेली नव्हती. त्यामुळे ही चॅम्पियन्स ट्रॉफी युवराज साठी म्हत्वाची असणार आहे. आयसीसीच्या टी 20 आणि 50 षटकांच्या विश्वचषकात त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. युवराजच्या आंतराष्ट्रीय करियरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी सोडचा आय़सीसीच्या सर्वच मोठ्या स्पर्धेत त्याने भारताचे नेतृत्व केले आहे. आणि त्यात त्याचे मोलाचे योगदान आहे.
 
भारतीय संघात निवड झाल्यानतंर माध्यमांशी बोलताना युवराजने चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आपले मनसुबे स्पष्ट केले. युवराज म्हणाला, 50 षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघात पुनरागमन झाल्याबद्दल मी आनंदी आहे. जेतेपदाचा बचाव करता यावा, यासाठी संघाच्या विजयात योगदान देण्याची आपली तयारी असेल. अन्य कुठल्याही आयसीसी स्पर्धेसारखीच ही देखील आव्हानात्मक स्पर्धा आहे. ओव्हलवर 18 जून रोजी अंतिम सामना खेळण्याच्या इराद्यानेच प्रत्येक संघ उतरणार, यात शंका नाही. मी 11 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार आहे. 
 

Web Title: Yuvraj Singh training session absent for "this" reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.