बिल गेट्स आणि कोंबड्या
By admin | Published: June 16, 2016 12:58 PM2016-06-16T12:58:19+5:302016-06-16T13:03:30+5:30
‘तुमच्याकडे दिवसाला फक्त दोन डॉलर्स असतील तर तुम्ही काय कराल? तुमचं जीवनमान कसं सुधाराल?’
Next
>- चिन्मय लेले
‘तुमच्याकडे दिवसाला फक्त दोन डॉलर्स असतील तर तुम्ही काय कराल? तुमचं जीवनमान कसं सुधाराल?’
असा प्रश्न मांडत बिल गेट्सनं अलिकडेच एक नवा विचार जगासमोर ठेवला.
‘जगभरात किमान शंभर कोटी लोक आज अत्यंत गरीबीत जगत आहेत. त्या माणसांनी जगायचं कसं?
याचं उत्तर मला त्यांच्याच जगण्यात सापडलं. आणि ते म्हणजे कोंबड्या पाळणं!
कोंबड्या पाळून गरीबी संपेल का? असं मला काही लोक विचारतीलही, पण ज्यांना काहीच शक्य नाही ते दोन पैसे कमवण्यासाठी एवढं तरी करुच शकतात!’ असं बिल गेट्सचं म्हणणं.
अलिकडेच स्वत:च्या वेबसाईटवर लिहिलेल्या एका छोट्या लेखात गेट्स म्हणतात की जर एका शेतकºयानं पाच कोंबड्या पाळल्या तर त्याचं उत्पन्न वर्षभरात वाढू शकतं.त्यातून बायकांनाही काम मिळू शकतं.
आणि म्हणून आम्ही ठरवलंंय की आफ्रिकेतल्या अती गरीब लोकांना कोंबड्या द्यायच्या किंवा कोंबड्या पाळायला पैसे द्यायचे. साधारण एक लाख कोंबड्या त्यांनी अफ्रिकेत देण्याचा निर्णय घेतला आहे.
गोष्ट अगदी सोपी आहे, मात्र गेट्स यांच्यावर याविषयासंदर्भात जगभरातून टीका आणि कौतूक एकाचवेळी होत आहे. कोंबड्या पाळून गरीबी हटणार नाही असं एका गटाचं म्हणणं तर निदान जगण्यापुरते पैसे मिळतील म्हणून हा उपक्रम स्तुत्य आहे.
पण गेट्स त्यांच्या ब्लॉगवर लिहितात की, लोक काहीही म्हणोत, कोंबड्या पाळण्याच्या कल्पनेनं मी तरी हरखून गेलोय, हाताला काम, आणि पोटाला अन्न या गोष्टीची ही सुरुवात आहे.
( माहिती सौजन्य- गेट्सनोट्स डॉट कॉम)