साराहाह डाऊनलोड करताय? आधी या 8 गोष्टी वाचा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:14 PM2017-08-18T18:14:17+5:302017-08-18T18:16:59+5:30

भारतात शिकलेल्या, विप्रोत काम करणार्या तौफिकने तयार केलेल्या साराहाह अॅपचा जगभर धुमाकूळ. मात्र वाढत्या धोक्याचं काय?

downloading sarahah? You must know these 8 things | साराहाह डाऊनलोड करताय? आधी या 8 गोष्टी वाचा.

साराहाह डाऊनलोड करताय? आधी या 8 गोष्टी वाचा.

googlenewsNext
ठळक मुद्देस्वतः च्या प्रेमात असलेल्या अनेकांना स्वस्तुती ऐकण्यासाठी मिळाला एक नवीन प्लॅटफॉर्म.जगभर पालकांची चिंता वाढली.निनावी अश्लिल मेसेज, धमक्या देणाऱ्यांचे काय? हा प्रश्न आहेच.

-चिन्मय लेले 

साराहाह. या नावानं सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तरुण तर दिवाने झालेत त्याच्या मागे. सोशल साईट्सच्या जगातलं हे एक नवीन वादळ आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम आणि स्नॅपचॅटवर त्याचेच चर्चे आहेत. आणि तुम्ही साराहाह वर आहात की नाही यावरुन युजर्समध्ये चांगली जुगलबंदी होतेय. त्या साराहाह( उच्चार करताना साराह) वर ज्यांनी कुणी निनावे भलेबुरे मेसेज लिहिले आहेत ते सोशल साईट्सवर शेअर करुन ‘कंही तू तो नहीं’ म्हणत गेस गेस खेळणं सुरु झालं आहे. आणि ज्यांनी अजून हे साराहाह आपल्या फोनमध्ये डाऊनलोड केलेलं नाही त्यांना हा काय मामला म्हणत कधी एकदा ते आपल्या फोनमध्ये येतंय असं झालंय. भारतातच नाही तर जगभर या साराहाह चे चर्चे आहेत. पण हे साराहाह जर तुम्ही डाऊनलोड करुन घेतलं असेल किंवा घेणार असाल तर काही गोष्टी नक्की माहिती करुन घ्या, आणि मग ठरवा की ते अ‍ॅप तुम्हाला हवं की नको!

साराहाह हे एक अ‍ॅप आहे. जे प्लेस्टोर किंवा अ‍ॅप स्टोअरला जाऊन फुकट डाऊनलोड करुन घेता येतं. आणि ज्यांनी त्या अ‍ॅपवर रजिस्टर केलं त्यांना अन्य रजिस्टर्ट युजर्स निनावी ‘काहीही’ मेसेज पाठवू शकतात. निनावी राहून वाट्टेल तो संदेश पाठवण्याची मुभा हा या अ‍ॅपचा सगळ्यात मोठा की पॉईण्ट आहे. मेसेज पाठवणार्‍याची ओळख काय वाट्टेल ते झालं तरी हे अ‍ॅप उघड करत नाही.

सौदी अरेबिअन डेव्हलपर झैन अल अबिदिन तौफिक यानं हे अ‍ॅप डेव्हलप केलं. हा तौफिक एकेकाळी भारतीय आयटी कंपनी विप्रोत काम करत होता. भारतीय विद्यापीठातच तो शिकलेला आहे. त्यानं सहा महिन्यांपूर्वी साराहाहची वेबसाईट बनवली होती. पण  13 जून हे अ‍ॅपच त्यानं  प्लेस्टोअरला उपलब्ध केलं आणि केवळ दोन महिन्यात या अ‍ॅपनं जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. आजवर 1 कोटी लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करुन घेतलं आहे. सध्याचं ते टॉप ट्रेण्डिंग अ‍ॅप आहे.

सेल्फ ऑबसेस अर्थात स्व स्तुतीची चटक लागलेल्या सोशल मीडीयातल्या युजर्सना हे अ‍ॅप आवडलं कारण बहुतांश कौतूकाचे मेसेज या साराहाहवर येताना दिसतात. आणि लोक आपलं कसं कौतूक करतात हे फेसबुकवर इतरांना दाखवत सुटलेल्या अनेकांना त्यामुळे मोठा आनंद होताना दिसतो आहे. विशेषतर्‍ फेसबुक युजर्सना नवीन काहीतरी या अ‍ॅपमुळे मिळालं आहे.

मात्र ते डाऊनलोड करुन वापरण्यापूर्वी किंवा वापरतानाही या 8 गोष्टी तुम्हाला माहितीच हव्यात.

 

1) साराहाह हे सध्ये अ‍ॅण्ड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी गुगल प्लेस्टोर आणि अ‍ॅप स्टोअरला उपलब्ध आहे. आणि केवळ हे अ‍ॅप काय आहे या उत्सुकतेपोटी अनेकजण फोनमेमरी डिलीट करत हे अ‍ॅप जगभर डाऊनलोड करुन घेत आहेत.

2) साराहाह हा एक अरेबिक शब्द आहे. त्याचा अर्थ होतो इमानदारी.  या अ‍ॅपची कल्पनाच अशी की लोकांना इतरांविषयी जी इमानदारीनं मनापासून सांगायचं ते सांगून टाकावं. अधिक कलात्मक, खास पद्धतीनं सांगावं. त्यासाठी आपलं नाव जाहीर करायची गरज नाही. मात्र हे अ‍ॅप वापरुन अनेकजण सायबर बुलिंग, ट्रोलिंग, अपमानही सर्रास करु लागले आहेत.

3) अ‍ॅप डाऊनलोड करताना आपला इमेल आयडी, पासवर्ड, युजर नेम रजिस्टर करावं लागतं. आपण आपली माहिती तिथं देतोच.

4) साराहाहवर जो मेसेज येतो, त्याला तिथंच डिरेक्टली रिप्लाय करता येत नाही. अर्थात ते सध्या रिप्लाय बटनवर काम करत आहेत. असं त्या अ‍ॅपवर स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी निनावी येणारे मेसेज वाचण्यापलिकडे आणि शेअर करण्यापलिकडे आणि स्वतर्‍ निनावी मेसेज पाठवण्यापलिकडे युजर काहीही करु शकत नाही.

5) तौफिकचे म्हणणेच आहे की, अ‍ॅप कुणाची ओळख जाहीर करणार नाही. पण जर अ‍ॅपचे नियम पाळले नाही तर ओळख जाहीर करू.

6) शाळकरी मुलंही हे अ‍ॅप वापरू लागले आहेत. एकमेकांना मेसेज पाठवत आहे, त्यानं पालकांची डोकेदुखी वाढली आहे. तसे रिव्ह्यूही पालक गुगल प्ले स्टोअरवर लिहित आहेत.

7) साराहाहवर युजर डायरेक्टली एखाद्या दुसर्‍या युजरला ब्लॉक करू शकत नाही. पण एखादा अलि मेसेज आला तर त्या युजरला मेसेजवर क्लिककरुन ब्लॉक करता येऊ शकतं, अर्थात तो मेसेज कुणी पाठवला हे कळण्याचं काही साधन नाही.

8) साराहाहवाले सांगत आहेत की आमची प्रायव्हसी पॉलिसी स्ट्रिक्ट आणि सुरक्षित आहे, पण हा डेटा रिव्हिल होऊ शकतो याची भीती जाणकार व्यक्त करत आहेत.

Web Title: downloading sarahah? You must know these 8 things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.