परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पूर्णेत महसूलची कारवाई ; वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:00 AM2018-06-21T01:00:34+5:302018-06-21T01:00:54+5:30

अवैधरित्या वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी २० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पकडले आहेत़ हे तिन्ही ट्रॅक्टर सध्या पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत़

Gangakhed in Purbhani District, Revenue Recovery in Puran; Three tractors of sand excavator were caught | परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पूर्णेत महसूलची कारवाई ; वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर पकडले

परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पूर्णेत महसूलची कारवाई ; वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर पकडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : अवैधरित्या वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी २० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पकडले आहेत़ हे तिन्ही ट्रॅक्टर सध्या पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत़
शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातील वाळू रेल्वे पुलाजवळ ट्रॅक्टरच्या सहाय्याने उत्खनन केली जाते़ हे वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर हे २० जून रोजी पहाटे गंगाखेड शहरात दाखल झाले़ रेल्वे पुलाजवळ वाळुचा उपसा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यानंतर वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर क्रमांक एमएच २२ एच- ५०९, एमचएच २६ ई-३९२२ आणि महिंद्रा ५७ डीआय चेसिज क्रमांक एनटीओआर २१९५ कंपनीचे हेड असे तीन ट्रॅक्टर हेड व दोन ट्रॉली पकडण्यात आल्या़ या कारवाईत चालक, ट्रॅक्टरचे मालक साहित्य टाकून पळून जाण्यास यशस्वी झाले़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी तलाठी शिवाजी मुरकुटे, अव्वल कारकून दत्तराव बिलापट्टे, दिलीप कासले, भालेराव यांना घटनास्थळी बोलावून ट्रॅक्टर ताब्यात घेतले़ तिन्ही ट्रॅक्टर हेड व दोन ट्रॉली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत़
पूर्णेत अवैध वाळूसाठा जप्त
पूर्णा- पूर्णा नदीपात्रात कान्हडखेड शिवारात २० जून रोजी ८० ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला आहे़ तहसीलदार मदनूरकर यांनी ही कारवाई केली़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास तहसीलदार मदनूरकर व कर्मचाºयांनी पूर्णा नदीपात्र परिसरात पाहणी केली असता, वेगवेगळ्या ठिकाणी वाळूचे ३ साठे आढळले़ शासकीय जमिनीवर हे साठे असल्याने पंचनामा करून सुमारे ८० ब्रास वाळू जप्त करण्यात आली़ जप्त वाळूसाठा लिलावात विकला जाणार असल्याची माहिती तहसीलदार मदनूरकर यांनी दिली़
गंगाखेडमध्ये जिल्हाधिकाºयांनी पोलिसांना विचारला जाब
पोलिसांनी या भागात एक तरी कारवाई केली का, अशी विचारणा गंगाखेडमध्ये कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांना जााब विचारल्याची चर्चा परिसरात होती़

Web Title: Gangakhed in Purbhani District, Revenue Recovery in Puran; Three tractors of sand excavator were caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.