परभणी : दीड एकरातील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:29 IST2018-01-30T00:28:59+5:302018-01-30T00:29:55+5:30
विद्युत तारांचे घर्षण होऊन दीड एकरावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील अकोली येथे घडली.

परभणी : दीड एकरातील ऊस जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : विद्युत तारांचे घर्षण होऊन दीड एकरावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील अकोली येथे घडली.
अकोली येथील सर्वे नं.७६ मध्ये उसाची लागवड करण्यात आली. या शेतजमिनीवरुन वीज तारा गेल्या असून २८ जानेवारी रोजी वीज तारांचे घर्षण होऊन उसाला आग लागली. यात सर्व ऊस जळून खाक झाला. या प्रकरणी शाम बिडगर यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पोलिसांनी स्टेशन डायरीला नोंद घेतली आहे. या घटनेत सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बिडगर यांनी सांगितले.