परभणीत व्यापाºयांचा मनपावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:57 AM2017-12-16T00:57:44+5:302017-12-16T00:58:38+5:30
महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत शहरातील व्यापाºयांनी शुक्रवारी महानगरपालिकेला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढला. परंतु, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मनपाला टाळे ठोकता आले नाहीत. यावेळी व्यापाºयांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत शहरातील व्यापाºयांनी शुक्रवारी महानगरपालिकेला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढला. परंतु, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मनपाला टाळे ठोकता आले नाहीत. यावेळी व्यापाºयांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.
एलबीटीच्या थकबाकी वसुलीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाने शुक्रवारी दुकाने बंद ठेवून दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपाला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढला. गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशनरोडमार्गे हा मोर्चा विसावा चौकात आल्यानंतर आंदोलनकर्त्या व्यापाºयांनी मोठे रिंगण करुन आयुक्तांची बदली करावी, व्यापाºयांकडून जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करणे थांबवावी. तसेच ज्या व्यापाºयांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले आहे, ते सील तात्काळ काढण्यात यावे, आदी मागण्यांसह घोषणा दिल्या. त्यानंतर हा मोर्चा मनपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला तेथेच अडविले. तेव्हा व्यापारी व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर व्यापाºयांनी राष्ट्रीय महामार्गावर आपले बस्तान मांडून मनपा आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी केली.
यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिन अंबिलवादे यांच्यासह इतर व्यापाºयांनी संताप व्यक्त करीत भूमिका मांडली. व्यापाºयांनी महामार्गावरच बस्तान मांडल्याने पोलिसांची चांगलीच गोची झाली. परभणी- वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. त्यानंतर व्यापारी आणि पोलिसांमध्ये केवळ व्यापाºयांचे पाच प्रतिनिधी मनपात सोडण्याचा तोडगा काढण्यात आला. व्यापाºयांच्या पाच प्रतिनिधींनी मनपा आयुक्त रेखावार यांच्या कक्षामध्ये जाऊन त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. मात्र या चर्चेमध्ये कोणताही पर्याय निघाला नाही. त्यामुळे व्यापाºयांनी पुन्हा शहरातील शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरु केले. या आंदोलनात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाºयांसह २०० ते ३०० व्यापारी सहभागी झाले होते.
पोलिसांच्या भूमिकेमुळे व्यापारी संतापले
मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आल्यानंतर व्यापाºयांनी रास्तारोको सुरु केला. त्यावेळी पोलीस अधिकाºयांनी मोर्चेकºयांना रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. यावेळी व्यापारी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर व्यापारी मनपात जात असताना क्यूआरटीच्या काही अतिउत्साही पोलीस कर्मचाºयांनी आडमुठी भूमिका घेतल्याने व्यापाºयांनी संताप व्यक्त केला. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी काही पोलीस कर्मचाºयांना चांगलेच सुनावले. त्यानंतर या पोलीस कर्मचाºयांनी नरमाईची भूमिका घेतली.