गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने जिंतूरचे नायब तहसीलदार घोडके निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:53 PM2017-09-16T15:53:59+5:302017-09-16T15:55:28+5:30
रॉकेलच्या किरकोळ परवानाधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जिंतूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार एस.ए. घोडके यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी आज निलंबित केले.
परभणी, दि. १६ : रॉकेलच्या किरकोळ परवानाधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जिंतूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार एस.ए. घोडके यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी आज निलंबित केले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जिंतूर तालुक्यातील येनोली येथील किरकोळ परवानाधारकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन तहसीलदार अश्विनी जाधव यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार एस.ए. घोडके यांना प्राधिकृत केले होते. मात्र, घोडके यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.
त्याचप्रमाणे २९ ऑगस्टपासून ते विनापरवाना गैरहजर राहिले. यामुळे तहसीलदारांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिसीचेही त्यांनी उत्तर दिले नाही. याप्रकरणी तहसीलदारांच्या अहवालावरून १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी घोडके यांच्या निलंबनाचे आदेश दिले.