गजलक्ष्मी योग: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्तम संधींचा काळ; पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ, सुखात वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 02:28 PM2024-04-24T14:28:01+5:302024-04-24T14:34:30+5:30

गजलक्ष्मी राजयोगाचा कोणत्या राशींना शुभलाभ मिळू शकतो, ते जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नियमित अंतराने नवग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. यामुळे अनेक शुभ योग, राजयोग जुळून येऊ शकतात. नवग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह मीन राशीत विराजमान झाल्यानंतर लगेचच शुक्र ग्रहाने मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश केला आहे.

मेष राशीत सूर्य आणि गुरु विराजमान आहेत. शुक्र ग्रहाच्या मेष राशीतील प्रवेशानंतर त्रिग्रही योग, शुक्रादित्य योग आणि गजलक्ष्मी योग जुळून येत आहे. काही मान्यतांनुसार २४ वर्षांनी असे शुभ योग जुळून येत आहेत. काही मतांनुसार, गुरु आणि शुक्र शत्रू ग्रह मानले जातात.

असे असले तरी गुरु, सूर्य आणि शुक्र या ग्रहांच्या युतीने जुळून आलेल्या शुक्रादित्य आणि गजलक्ष्मी योग ७ राशींसाठी अनन्य साधारण तसेच लाभदायी ठरू शकतो. आगामी काळ वरदानाप्रमाणे ठरू शकतो, तसेच लक्ष्मी देवीची कृपाही लाभू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

मेष: गजलक्ष्मी योग आनंदकारक ठरू शकेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. पद आणि प्रतिष्ठा मिळेल. व्यवसायात जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. पालकांच्या पाठिंब्याने ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कर्क: गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य राजयोग वरदानापेक्षा कमी नाही. भौतिक सुख-सुविधा आणि सुखसोयींचा लाभ घेऊ शकाल. कामात यश मिळण्याची दाट शक्यता असते. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. करिअरसाठी फायदेशीर ठरेल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

सिंह: गजलक्ष्मी योग भाग्यकारक ठरू शकेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. उच्च शिक्षणात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या लोकांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे किंवा नोकरी करायची आहे, त्यांना यश मिळू शकते. बँक बॅलन्समध्ये वाढ होईल. शुभ कार्यात पैसा खर्च होईल.

तूळ: गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होऊ शकेल. आर्थिक उत्पन्नाचे अनेक स्त्रोत प्राप्त होण्याची संधी मिळू शकेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या संधीही मिळू शकतात. बरेच फायदे मिळू शकतील.

धनु: गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने अडचणींवर मात करण्यात यशस्वी होऊ शकाल. देवी लक्ष्मीच्या कृपेने कामात नशिबाची साथ मिळेल. अनपेक्षित आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी पैसे वाचवू शकाल.

मकर: गजलक्ष्मी योग वरदानापेक्षा कमी नाही. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. लक्ष्मीची पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. सासरच्या लोकांकडून आर्थिक मदत मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकेल. कामात अधिक व्यस्त असाल. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

कुंभ: गजलक्ष्मी योग फायदेशीर ठरू शकतो. जीवनातील प्रत्येक आव्हानावर मात करू शकाल. लक्ष्मीच्या कृपेने नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामात यश मिळेल. थोडे कष्ट करूनही तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरदार लोकांसाठी हा राजयोग शुभ ठरू शकतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.