पुढच्या वर्षी लवकर या....

By admin | Published: September 27, 2015 12:00 AM2015-09-27T00:00:00+5:302015-09-27T00:00:00+5:30

महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात रविवारी बाप्पाला निरोप देण्यात आले. दिल्लीत विसर्जनापूर्वी बाप्पासोबत फोटो काढताना एक कुटुंब.

नाशिकमध्ये गणरायाला ढोलताशांच्या गजरात निरोप देण्यात आला असून नाशिक महापालिकेनेही नदीतील प्रदुषण रोखण्यासाठी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले होते. या मोहीमेला नाशिककरांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.

राज्यभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत यंदाची तरुणाईचा उत्साह दिसून आला. यंदा पुण्यातील गणेशोत्सवाने विसर्जनाचा नवा पायंडा घालून दिला असून पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचे नदीऐवजी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही बाप्पाला निरोप देण्यात आला. वर्षा बंगल्यातील कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करत मुख्यमंत्र्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा संदेशच दिला.

मुंबईतील श्रॉफ बिल्डींग येथे विसर्जनादरम्यान गणरायावर पुष्पवृष्टी करण्याची परंपरा आहे. यंदाही परंपरा जोपासत श्रॉफ बिल्डींग येथे गणरायावर पृष्पवृष्टी करतानाचे मनमोहक दृश्य.

मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणा-या गणेश गल्लीच्या राजाची विसर्जन मिरवणूक.

दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. ढोलताशांचा गरज गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबईतील ख्यातनाम लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी गर्दी केली होती. राज्यभरातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची ही एक झलक...