गोविंदा आला रे

By admin | Published: September 6, 2015 12:00 AM2015-09-06T00:00:00+5:302015-09-06T00:00:00+5:30

ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला कॅलेंडर गर्ल्स या हिंदी चित्रपटाच्या टीमने हजेरी लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.

मुंबईतील शिवसेनेच्या एका पदाधिका-याने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना पारितोषिक म्हणून चक्क कांदे देण्यात आले.

सात आठ थर रचणा-या गोविंदा पथकांची चित्तथरारक क्षण कॅमे-यात कैद करताना लोकांची झुंबड उडाली होती.

घाटकोपरमध्ये भाजपा खासदार किरीट सोमय्या व आमदार राम कदम यांनीदेखील हंडी फोडून दहीहंडी साजरी केली.

पडणार पण हार मानणार नाही..... थर कोसळल्यानंतरही गोविंदा पथकांनी आत्मविश्वास कमी झाला नव्हता. अपयश आल्यावरही पुन्हा ताकदीने उभं राहण्याचा संदेशच या गोविंदा पथकांनी दिला.

दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्याचा अयशस्वी प्रयत्न.

दहीहंडी फोडताना गोविंदा पथक...

एकीचे बळ..... थर रचण्याची तयारी करताना मुंबईतील गोविंदा पथक

गोविंदा आला रे असं म्हणत थरावर थर रचणारी गोविंदा पथकं डिजेवर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. दहीहंडी उत्सवाची ही झलक...