पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:33 PM2024-04-23T12:33:55+5:302024-04-23T12:42:47+5:30

पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ चे सर्वत्र वारे वाहत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. परंतु, मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदान घटल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे.

पक्ष वाढले... उमेदवार वाढले... प्रचार वाढला, मतदारांची संख्याही वाढली.. पण मतदानाच्या टक्केवारीचे काय? लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याने चिंता व्यक्त होतानाच दुसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या तीन दिवसांवर आले आहे.

त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात जोरदार जनजागृती सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात मागील निवडणुकीत काय स्थिती होती? यावर आपण प्रकाश टाकणार आहोत.

पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील चार मतदारसंघांत मतदानात घट झालेली दिसून येते. भंडारा- गोंदियामध्ये १.२३ टक्के, गडचिरोली-चिमूरमध्ये ०.४५ टक्के, रामटेकमध्ये १.३ टक्के तर नागपूरमध्ये ०.६४ टक्क्यांनी घट झाली आहे. चंद्रपूरमध्ये मात्र, २.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(१) बुलढाणा - २०१४ (६१.३५%) - २०१९ (६३.०६%) (२) अकोला - २०१४ (५८.५१%) - २०१९ (६०.०६%) (३) अमरावती - २०१४ (६२.२९%) - २०१९ (६०.७६%).

(४) वर्धा - २०१४ (६४.७९%)-२०१९ (६१.५३) (५) यवतमाळ वाशिम - २०१४ (५८.८७%)-२०१९ (६१.३२%) (६) हिंगोली - २०१४ (६६.२९%) - २०१९ (६६.८४%).

(७) नांदेड - २०१४ (६०.११)- २०१९ (६५.६९%) आणि (८) परभणी - २०१४ (६४.४४%)-२०१९ (६३.१२%)