राष्ट्रीय प्राणी वा पक्षी म्हणून एखाद्या पक्षी प्राण्याला गौरवले जाते फुलपाखराकडे मात्र आजपर्यंत दुर्लक्षच झाले आहे. राष्ट्रीय वा राज्यस्तरीय फुलपाखरू म्हणून कोणत्याही फुलापाखराला मान मिळालेला नाही.फुलपाखरे ही अतिशय संवेदनशील असतात हवेच्या १० लाख रेणूंमध्ये गंधाचे तीन रेणूही एका फुलपाखराला दुस-याचा माग काढण्यासाठी पुरेसे असतात. गंधाच्या बाबतीत संवेदनशील असल्याने फुलपाखरू प्रदूषणातही टिकाव धरू शकतं.फुलपाखरांचं खाणंही मोठं गमतीदार असतं. कुजलेल्या फळामध्ये प्रक्रिया होऊन तयार झालेले अल्कोहोल कुजलेल्या प्राण्यांच्या शरीरातील द्रवरूप क्षार कुजलेले खेकडे मासे यातील क्षार असे सर्व द्रवरूपी क्षार फुलपाखरे व पतंग शोषून घेतात.तसे पाहता फुलपाखरांचे फुलपाखरांचे आयुष्य जेमतेम ३० दिवसांचे असते. तर काही फुलपाखरे अवघा एखादा दिवस जगतात.संपूर्ण भारतात फुलपाखरांच्या सुमारे दीड हजार प्रजाती आढळतात. यापैकी महाराष्ट्रात ३०० च्या आसपास तर आंबोली व पारपोली येथे सुमारे २०४ प्रजाती आढळतात.सौदर्ण बर्डविंग क्रुझर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉनमॉन पॅरिस पिकॉक कमांडर लेमन पॅन्सी चॉकलेट पॅन्सी रड स्पॉट ड्युक बॅरॉन इव्हिनिंग ब्राउन ग्रास यलो ऑरेंज टीप ही आणि अशी अनेक दुर्मिळ व आकर्षक २०४ प्रजातींची फुलपाखरं आंबोलीत पहायला मिळतात.आंबोली येथील फुलपाखरू महोत्सवादरम्यान सावंतवाडी तालुक्यातील पारपोली गावाची फुलपाखरांचा गाव म्हणून निवड करण्यात आली.फुलपाखरू आणि पतंग अशा दोन वर्गांमध्ये या कीटकाचे वर्गीकरण होते. फुलपाखरू साधारणत: दिवसाच उडते फुलांवर बसताना पंख मिटून बसते. तर पतंग ज्याला इंग्रजीत मॉथ असे म्हणतात ते रात्रीच्या वेळेस उडतात व फुलांवर बसताना त्याचे पंख उघडे असतात.या महोत्सवादरम्यान फुलपाखरू उद्यान कसे उभे करावे व आपल्या अंगमात फुलपाखरे कशी बागडतील या विषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.कीटक प्रजातीत मोडणारे फुलपाखरू पुरातन काळापासून लहान-थोर सर्वांनाच आकर्षित करत आले आहे. फुलपाखरांच्या विविधतेची ओळख जास्तीत जास्त निसर्गप्रेमी पर्यटकांना व्हावी यासाठी मलबार निसर्ग संस्थेकडून कोकणातील आंबोली येथे नुकताच फुलपाखरू महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ( फोटो : निर्माण चौधरी काका भिसे व मलबार निसर्ग संस्था)