alia bhat and ranveer singh shoot at mumbais goregaon railway station
'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 03:20 PM2018-04-17T15:20:25+5:302018-04-17T15:20:25+5:30Join usJoin usNext झोया अख्तरचा आगामी 'गल्ली बॉयज' या सिनेमाचं शूटिंग मुंबईतील गोरेगाव स्टेशनवर करण्यात आले. यावेळी आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह स्टेशनवर अगदी बिनधास्त फिरताना दिसले. लाल रंगाचा टी-शर्ट, जीन्स, उन्हापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी डोक्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ, हातात मोबाइल आणि बॅग अशा अवतारात आलिया एकदम मुंबईकर कॉलेज तरुणी वाटत होती. नेहमी लोकल पकडण्यासाठी धावणा-या मुंबईकरांनीही गर्दीत आलियाला ओळखलं नाही. सर्वसामान्य मुंबईकर तरुणीप्रमाणे गोरेगावच्या प्लॅटफॉर्म क्र.3वर आलिया लोकलची वाट पाहत असल्याचे दिसलं. अभिनेता रणवीर सिंह चॉकलेटी टी शर्ट, डेनिम जॅकेट आणि जीन्समध्ये गोरेगावच्या पूलावर दिसला. आलिया आणि रणवीरचा हा अंदाज इतका साधा होता की कुणीही त्यांना ओळखू शकलं नाही. टॅग्स :अलिया भटरणवीर सिंगAlia BhatRanveer Singh