जाणून घ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या स्वदेशी विमान निर्मिती प्रकल्पाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:25 IST2018-02-22T14:49:52+5:302018-02-23T14:25:39+5:30

आपल्या देशात स्वदेशी तंत्रज्ञानाने विमान निर्मितीचे स्वप्न पाहणऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३५ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला.

विमान निर्मिती कारखान्यासाठी पालघर येथे १५७ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विमाननिर्मितीचा देशातील पहिला कारखाना महाराष्ट्रात असणार आहे.

या विमान बांधणीच्या प्रकल्पातून सुमारे १० हजार जणांना रोजगार मिळेल.