गोव्यातील समुद्रकिना-याला ओखी चक्रीवादळाचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 22:41 IST2017-12-03T22:33:29+5:302017-12-03T22:41:46+5:30

गोव्यातील पेडणे तालुक्यातील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी किनारी भागाला ओखी चक्रीवादळाचा फटका बसला आहे.
तामिळनाडूच्या समुद्रकिना-यावरील ओखी चक्रीवादळ गोव्यात धडकलं आहे.
गोव्याच्या किनारी भागातील शॅकची या वादळात वाताहत झाली आहे.
शॅकमध्ये पाणी घुसून किमान 50 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाली. निसर्ग कधी अवकृपा दाखवेल हे सांगता येणार नाही.
रविवारी किनारपट्टी भागात उभारलेल्या शॅकमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडून त्यात लाखोंची हानी झाली. या वादळामुळे कोलवा बीचवर आयोजित स्विमथॉन 2017 स्पर्धाही आयोजकांना रद्द करावी लागली.