Does the country run due to patriotism? 'Dynasty' in Bollywood and politics
देश घराणेशाहीमुळे चालतो का? बॉलिवूड आणि राजकारणातील 'घराणेशाही' By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 05:47 PM2017-09-12T17:47:48+5:302017-09-16T15:00:01+5:30Join usJoin usNext काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यामुळे पुन्हा एकदा राजकारणातल्या घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे. समाजवादी पार्टीची धुरा संभाळणारे अखिलेश यादव माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे सुपूत्र आहेत. एम.के.स्टॅलिन हे द्रमुक पक्षाचे प्रमुख करुणानिधी यांचे सुपूत्र आहेत. स्टॅलिन यांच्याकडे भविष्यातील तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र आहेत. उद्धव बाळासाहेबांचे राजकीय वारसदार आहेत. राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी मनसे हा स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यापूर्वी ते शिवसेनेत होते. उद्धव ठाकरेंबरोबर मतभेद तीव्र झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली. कंगना राणौतनं काही दिवसांपूर्वी करण जोहरवर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा झेंडा मिरवण्याचा आरोप करुन तो 'मुव्ही माफिया' आहे, अशी खोचक टीका केली होती. अभिषेक बच्चन अभिनयाचे शेहनशहा अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. रणबीर कपूर आघाडीचा अभिनेता असून, त्याचे वडिल ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनी 80-90चे दशक गाजवले होते. सोनम कपूर अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी असून, वडील आणि मुलगी दोघेही आज वेगवेगळया सिनेमांमध्ये व्यस्त आहेत. तुषार कपूर - जिंतेद्र या सदाबहार कलाकाराची मुलगा असलेला तुषार बॉलीवूडमधल्या कॉमेडी सिनेमांमध्ये चमकलाय. एकता कपूर - मोठ्या पडद्यापासून लांब राहिलेल्या जितेंद्रच्या या मुलीने सास भी कभी बहूसारखे अनेक डेली सोप छोट्या पडद्याला दिले आहेत. फरहान अख्तर - जावेद अख्तरच्या मुलानं फरहाननं बॉलीवूडमध्ये काही हिट चित्रपट दिले आहेत. भाग मिल्खा भागमधल्या त्याच्या अभिनयाचं चांगलं कौतुक झालं आहे. करीना कपूर - गेली 100 वर्षे सिनेसृष्टीत असलेल्या कपूर खानदानातल्या करीनानं मोठी बहीण करीश्माच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलीवूडमध्ये करीअर केलं. करीश्मा कपूर - गोविंदाबरोबर अनेक कॉमेडी हिट देणारी करीश्मा दिल तो पागल हैमध्ये माधुरीसमोरही फिकी पडली नाही. लग्न झाल्यानंतर अभिनयाला राम राम करणाऱ्या करीश्मानं बॉलीवूडमध्ये काही काळ चांगलाच गाजवला. सैफ अली खान - वडील क्रिकेटर व आई अभिनेत्री असलेल्या सैफनं बॉलीवूडमध्ये करीअर केलं. ह्रितिक रोशन - राकेश रोशनच्या या मुलानं कहो ना प्यार है पासून बॉलीवूडमधली कराकिर्द सुरू केली आणि अनेक चढ उतार बघत सिनेसृष्टीत आपलं स्थान तयार केलं. रितेश देशमुख - महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या या मुलाने बॉलीवूडमध्ये करीअर केलं. मराठीमध्येही काही सिनेमांमध्ये झळकलेला रितेश सिनेसृष्टीत स्थिरावलाय. सलमान खान - वडील सलीम खान यांनी स्क्रिप्ट रायटर म्हणून कारकीर्द गाजवली. मुलांपैकी सलमान हा बॉलीवूडमधला सुपरस्टार झाला. बॉबी देओल - धर्मेंद्रचा हा दुसरा मुलगा मात्र बॉलीवूडमध्ये फारसा प्रभाव पाडू शकला नाही. सनी देओल - धर्मेंद्रच्या प्रमाणेच हाणामारीच्या सिनेमांमध्ये चांगला ठसा सनीनं उमटवला. अर्जून, दामिनीसारखे अनेक गाजलेले चित्रपट सनीनं दिले आहेत. सोनाक्षी सिन्हा - शत्रुघ्न सिन्हाच्या या मुलीनं बॉलीवूडमध्ये यशस्वी आगमन केलं आहे. अथिया शेट्टी - वडील सुनील शेट्टींच्या पावलावर पाऊल ठेवत अथियानं बॉलीवूडची वाट चोखाळली. शबाना आझमी - कैफी आझमी या प्रख्यात शायराच्या मुलीनं शबानानं मुख्य धारेतील चित्रपटांबरोबर समांतर सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाची चांगली छाप सोडली आहे. अजित पवार - काका शरद पवार यांचं राजकारण जवळून बघितलेल्या अजित पवारांनी राज्यातल्या राजकारणात जम बसवला. सुप्रिया सुळे - वडील शरद पवार यांच्याकडून राजकाराणाचं कडू घेतलेल्या सुप्रिया केंद्रातील राजकारणात रमल्या. विश्वजीत कदम - पतंगराव कदमांचा मुलगा असलेला विश्वजीत युवा नेता म्हणून उदयास आला, परंतु लोकसभेत मात्र मोदी लाटेत अपयशी ठरला. आदित्य ठाकरे - आजोबा बाळासाहेब व वडीव उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच आदित्यनेही राजकारण हेच करीअर निवडलंय.टॅग्स :राहुल गांधीRahul Gandhi