computex 2019 asus zenbook duo series with dual display announced coming to india later this year
दोन स्क्रीनवाला जगातील पहिला लॅपटॉप लाँच, जाणून घ्या खासियत By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 10:39 AM2019-05-28T10:39:29+5:302019-05-28T10:44:14+5:30Join usJoin usNext लोकप्रिय टेक्नॉलॉजी कंपनी असुस (Asus) ने कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. यामध्ये कंपनीने लाँच केलल्या ड्यूल स्क्रीनवाल्या लॅपटॉपची सर्वाधिक चर्चा आहे. Asus ZenBook Pro Duo असं या लॅपटॉपचं नाव असून तो जगातील पहिला दोन स्क्रीन असलेला लॅपटॉप आहे. ZenBook Pro Duo मध्ये देण्यात आलेली दुसरी स्क्रीन कीबोर्डसोबतच्या एरियामध्ये देण्यात आली आहे. कीबोर्डच्या अगदी वरच्या बाजूला ही स्क्रीन देण्यात आली आहे. दोन स्क्रीन असलेल्या या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाची 4K UHD OLED HDR सपोर्टिंग टच स्क्रीन देण्यात आली आहे. युजर्स कोणतीही विंडो दुसऱ्या स्क्रीनवर ड्रॅग करू शकतात. मेन स्क्रीनमध्ये असुसने नॅनो एज डिजाईनचा वापर केला आहे. जेणेकरून डिस्प्लेला चारही बाजूने थिन बेजल्स देण्यात आले आहेत. लॅपटॉपमध्ये नंबर पॅड डायल फंक्शन देखील देण्यात आले आहे. कीबोर्डमध्ये आरामात टायपिंग करता यावं म्हणून पाम रेस्ट देण्यात आलं आहे. लॅपटॉपमध्ये 9th जनरेशन इंटेल कोर i7 (9750H) किंवा i9 (9980HK) प्रोसेसर देण्यात येणार असून 32GB DDR4 रॅम दिली जाणार आहे. लॅपटॉपमध्ये कोणताही एसडी कार्ड सपोर्ट देण्यात आलेला नाही. 2.5 किलोग्रॅम वजनाचा हा लॅपटॉप आहे. भारतात हा दोन स्क्रीन असलेला लॅपटॉप कधी लाँच करण्यात येणार याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. टॅग्स :लॅपटॉपतंत्रज्ञानlaptoptechnology