Women's Day 2019 : गुगलचं खास डुडल, नारी शक्तीला सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 09:38 AM2019-03-08T09:38:58+5:302019-03-08T09:57:48+5:30

गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं.

गुगलने 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे. गुगलने खास डुडलद्वारे स्त्री शक्तीला सलाम केला आहे.

आज जगभरात महिला शक्ती आणि महिलांच्या सन्मानासाठी महिला दिन (International Womens Day) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे.

गुगलनेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सशक्तीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत.

गुगलने बनवलेल्या खास डुडलवर क्लिक केल्यानंतर जगभरातील वेगवेगवळ्या भाषांमधील कोट्स दिसू लागतात. तसेच कोट्स देणाऱ्या महिलांचे नाव सुद्धा या ठिकाणी वाचता येते.

भारताची महिला बॉक्सर मेरी कॉमच्या नावाचाही समावेश आहे. 'तुम्ही एक स्त्री आहात म्हणून तुम्ही स्वत:ला कमकुवत समजू नका' असं मेरी कॉमने या कोट्समध्ये म्हटलं आहे.

गुगलने या खास आणि महत्त्वपूर्ण डुडल स्लाइडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा पर्याय सुद्धा दिला आहे.

महिलांच्या प्रेरणादायक कोट्समध्ये जगभरातील प्रतिभावंत महिलांचा एक समूह डिझाईन करण्यात आला आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त एअर इंडियाने हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे.

आज जागतिक महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत.

जगभरात आज महिला दिन (International Womens Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च हा महिला दिवस 1943 साली साजरा झाला. 1971 सालच्या 8 मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले.

बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच काही काही घरांमधूनही 8 मार्च साजरा होत आहे.

आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सोशल मीडियातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.