आश्चर्यकारक डिझाईन असलेले 'हे' स्मार्टफोन्स कधी पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 03:40 PM2018-04-25T15:40:22+5:302018-04-25T15:40:22+5:30

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला स्वत:च्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसेल अशाच फोन्सची खरेदी करायला आवडते. त्यामुळे आकर्षक डिझाईन्स व रंग असलेले फोन बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जातात. म्हणून मोबाईल कंपन्यांनी विविध रंगाचे व ढंगाचे स्मार्टफोन लॉन्च करायला सुरूवात केली. असेच काही आकर्षक व विचित्र डिझाईन असलेले फोन आपण पाहणार आहोत

१) सॅमसंग NPH-N270 - २००३ मध्ये लॉंच झालेला हा फोन मीडियाचा वापर जास्त करणाऱ्या लोकांसाठी खास बनवण्यात आला होता. हा सॅमसंगचा वॉलपेपर, स्क्रिनसेवर आणि रिंगटोन्स असणारा पहिला फोन होता.

२) सिमेन्स झेलिब्री ६ - महिलांच्या आवडी विचारात घेऊन सिमेन्स झेलिब्री हा फोन बनवण्यात आला होता. २००३ साली हा फोन लॉन्च करण्यात आला होता. महत्वाची बाब म्हणजे या फोनमध्ये २ आरसे होते.

३) व्हर्च्यू सिग्नेचर कोब्रा - नोकियाने लॉंच केलेल्या या फोनचं डिझाईन कोब्रा सापासारखं होतं. २००६ मध्ये हा फोन लॉन्च केला तेव्हा याची किंमत ३ लाख रुपये इतकी होती.

४) नोकिया ७६०० - नोकियाने विविध नाविन्यपूर्ण डिझाईन्सचे फोन लॉन्च केलेत. २००३ मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या फोनला २ इंचाचा डिस्प्ले होता व चारही बाजूंनी कीपॅड होता.

५) एल जी न्यू चॉकलेट - या एलजीच्या फोनला ४ इंचाचा डिस्प्ले होता. आणि हा फोन टचस्क्रिन होता. चॉकलेटच्या पॅकेटसारखा दिसणारा हा फोन होता म्हणून या फोनला चॉकलेट फोन म्हणतात.