व्हॉट्स अॅपमधील नवीन फिचर्स

By admin | Published: August 27, 2015 12:00 AM2015-08-27T00:00:00+5:302015-08-27T00:00:00+5:30

पर्सनल कॉन्टॅक्ट्स देखील करता येणार म्यूट: आतापर्यंत फक्त ग्रुप संभाषण म्यूट करता येत होते. मात्र आता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचे असेल तर त्याच्या चॅटला देखील म्यूट करता येईल. ज्या कॉन्टॅक्टला म्यूट करायचे असेल तर अबाउट मेन्यूमध्ये म्यूट बार द्वारे तसे करता येईल. तसेच कितीवेळासाठी त्याला म्यूट करायचे आहे हे देखील करता येणार आहे.

कस्टम नोटिफिकेशन्स: वॉट्सअॅपने यावेळी कस्टम ऑप्शन्स कॉन्टॅक्ट लेवलवर देखील दिले आहेत जे याआधी संपूर्ण अॅपसाठी वापरले जात होते. जसे आता जर तुम्ही कोणत्या कॉन्टॅक्टसाठी खास रिंगटोन सेट करू इच्छीत असाल तर तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमधील कोणत्याही गाण्याला निवडून त्या कॉन्टॅक्टची रिंगटोन ठेवू शकतात. त्यामुळे तुम्हाला फोन न उचलता देखील लक्षात येईल की कोणाचा मेसेज आला आहे. याच प्रकारे तुम्ही नोटिफिकेशन्ससाठी वेगवेगळे लाइट कलर देखील निवडू शकतात. वायब्रेशन इनेबल आणि डिसेबल करू शकता आणि प्रत्येक कॉन्टॅक्टसाठी पॉप-अप नोटिफिकेशन्स सेट करू शकतात.

मार्क अॅझ अनरेड: या फीचर अंतर्गत यूझर्स मेसेज वाचल्यानंतर त्याला अनरेड (unread) मार्क करू शकतात. तुम्हाला सांगू इच्छीतो की फीचरने मेसेजला अनरेड मार्क केल्यानंतर असे नाही वाटत की कोणी हा मेसेज वाचलाच नाही. तर त्याचा उपयोग तुम्ही त्या मेसेजेसना हाइलाइट करण्यासाठी करू शकतात ज्या मेसेजना तुम्ही नंतर देखील वाचू इच्छीतात. मेसेजला अनरेड मार्क केल्याने अॅपमध्ये कॉन्वर्जेशनचा क्रम देखील बदलत नाही.

नवे ईमोजी

व्हॉट्सअॅप कॉल्समधे वाचणार डेटा....... व्हॉट्सअॅप कॉल मुळे डेटा अधिक जात असेल आणि आपल्याला डेटा वाचवायचा असेल तर सेटिंग्समध्ये चॅट्स अँड कॉल्स मेन्यू वर जा. इथे आपल्याला लो डेटा यूसेजचा नवा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि वॉइस कॉल्सवर आपला डेटा वाचवा...

व्हॉट्सअॅपने एका महिन्याच्या बीटा टेस्टिंगनंतर अँड्रॉइड यूझर्ससाठी v2.13.250 लॉन्च केले आहे. यामुळे व्हॉट्सअॅप मेसेजिंग मध्ये मज्जेदार नवीन फीचर्स अद्यावत झाले आहेत. जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स ? त्यासाठी पुढील अन्य स्लाइडवर क्लिक करा ....