whatsapp new features update 5 new feature will come soon on android app dark mode to payment
WhatsApp चॅटींगची गंमत वाढणार, लवकरच 'हे' धमाकेदार फीचर्स येणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 02:58 PM2019-07-01T14:58:33+5:302019-07-01T15:20:05+5:30Join usJoin usNext व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून व्हॉट्सअॅप युजर्ससाठी सातत्याने फीचर्स आणत असतं. WhatsApp चॅटींगची गंमत आणखी वाढणार आहे कारण लवकरच व्हॉट्सअॅपवर धमाकेदार फीचर्स येणार आहेत. या फीचर्सबाबत जाणून घेऊया. ऑनलाईन स्टेटस हाईड करा (Hide Online Status On Whatsapp) ऑनलाईन स्टेटस हाईड फीचरच्या मदतीने युजर्स लास्ट सीन, रीड आणि रिसिप्टसारखे फीचर्स कंट्रोल करू शकतो. ऑनलाईन स्टेटस हाईड केल्यावर दुसऱ्या युजर्सना ते दिसणार नाही.व्हॉट्सअॅप पे (WhatsApp Pay) व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंटचं टेस्टिंग सुरू केले आहे. हे फीचर लवकरच सर्वांसाठी येणार आहे. पैशाचे व्यवहार करणे या फीचरमुळे सोपे होणार आहे. डार्क मोड (Whatsapp Dark mode) व्हॉट्सअॅपने रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून अॅपने डार्क मोड फीचर आणले आहे. सध्या या फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे. फोटो साईज (Whatsapp Pic Size) व्हॉट्सअॅपवर फोटो शेअर केल्यावर ऑटोमॅटीक फोटोचं रेजोल्यूशन कमी होतं. ज्यामध्ये मोठ्या आकाराच्या फोटोची क्वालिटी कमी होते. मात्र नवीन फीचर आल्यावर रेजोल्यूशन कमी न करता मोठ्या साईजमध्ये फोटो शेअर करता येणार आहेत. बॅकअप सुविधा (whatsapp chat backup) व्हॉट्सअॅप चॅटच्या बॅकअपची सुविधा देतं तसेच डिव्हाईस बदलल्यानंतर ते सुरक्षित ठेवलं जातं. टॅग्स :व्हॉटसअॅपतंत्रज्ञानWhatsApptechnology