WhatsApp वर 2019 मध्ये येणार 'ही' खास फीचर्स By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 03:05 PM 2019-01-01T15:05:52+5:30 2019-01-01T15:22:13+5:30
WhatsApp हे अत्यंत लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. चॅटींगची गंमत वाढवण्यासाठी WhatsApp नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीसर्च आणत असतं. जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019 चे स्वागत करण्यात आले आहे. WhatsApp ही 2019 या नवीन वर्षात युजर्ससाठी काही खास फीचर्स आणणार आहे त्याबाबत जाणून घेऊया.
Dark Mode फीचर - WhatsApp अनेक दिवसांपासून Dark Mode या खास फीचरवर काम करत आहे. 2019 मध्ये हे फीचर येणार आहे. रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून WhatsApp लवकरच डार्क मोड फीचर आणणार आहे. हे फीचर ऑन केल्यावर WhatsApp वर बॅकग्राऊंड कलर काळा होणार आहे. त्यामुळे अधिक वेळ युजर्स चॅट करू शकतात.
Private Reply फीचर - WhatsApp प्रायव्हेट रिप्लाय फीचरची सुविधा ग्राहकांसाठी आणणार आहे. या फीचर्सच्या माध्यमातून ग्रुप चॅटमध्येही तुम्ही प्रायव्हेट रिप्लाय करू शकता. या फीचरच्या मदतीनं ग्रुप चॅटमध्येही कोणत्याही अडचणीविना एक युजर्स दुसऱ्या युजर्सशी चॅट करू शकतो. WhatsApp ग्रुपवरचे मेसेज पाहण्यासाठी तीन डॉटवर क्लिक करून प्रायव्हेट रिप्लायचा पर्याय वापरू शकता.
क्यूआर कोड स्कॅन कॉन्टॅक्ट फीचर - 2019 मध्ये WhatsApp वर क्यूआर कोड स्कॅन कॉन्टॅक्ट ही सुविधा मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने आपण क्यूआर कोड स्कॅनच्या माध्यमातून नवीन कॉन्टॅक्टसोबत जोडले जाणार आहोत. तसेच तुमचा कॉन्टॅक्टही तुम्ही क्यूआर कोडने शेअर करू शकता.
कॉन्टॅक्ट रँकींग फीचर - WhatsApp वर या फिचरच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट रँकींग केलं जाणार आहे. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही जास्त चॅट कराल. ती व्यक्ती कॉन्टॅक्टमध्ये सर्वात वरती दिसेल. तसेच त्यानूसार इतर कॉन्टॅक्टचा क्रम ठरवला जाईल.
मल्टीपल व्हॉईस मेसेज फीचर - WhatsApp वर चॅट करताना आलेले मल्टीपल व्हॉईस मेसेज ऐकता येणार आहेत. तुम्हाला फक्त एकदा एक व्हॉईस मेसेज प्ले करावा लागणार आहे. त्यानंतर आपोआप सर्व मेसेज प्ले होतील. सध्या हे फीचर केवल बीटा व्हर्जनवर अपलब्ध आहे.