लोणावळ्यात १५ घरफोड्या करणारा आरोपी गजाआड ; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 05:01 PM2018-09-22T17:01:12+5:302018-09-22T17:12:00+5:30

लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली.

15 house breaking accussed arrsted at Lonavla; 15 lakhs materials seized | लोणावळ्यात १५ घरफोड्या करणारा आरोपी गजाआड ; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

लोणावळ्यात १५ घरफोड्या करणारा आरोपी गजाआड ; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

Next
ठळक मुद्देआरोपीचे अजुन तीन साथीदार आरोपी फरार

लोणावळा : लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून १५ घरफोड्या उघडकीस आल्या असून १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वसिम रुबाबअली शेख (वय २२, रा. इंदिरानगर, लोणावळा) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला २४ तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
  पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक संदीप जाधव यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची माहिती दिली. यावेळी लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खुने व तपास पथक उपस्थित होते.
      मागील दोन वर्षात लोणावळा शहरात घरफोड्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली होती. मात्र, आरोपी हाती लागत नसल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते. नुकत्याच पुणे ग्रामीणच्या अधिक्षक पदावर रुजु झालेले संदीप पाटील, अपर अधिक्षक संदीप जाधव, ज्ञानेश्वर शिवथरे व पोलीस निरीक्षक भगवान पाटील यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले असता तुंगार्ली येथील घरी येत नसलेला आरोपी वसिम शेखचा शोध तो हनुमान टेकडी परिसरात भाड्याने राहत असल्याचे समजले. त्याला संशयावरुन ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने लोणावळा परिसरात घरफोड्या केल्याच्या पंधरा घटनांची कबुली दिली. तसेच त्याने चोरलेला मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. वसिम याचे अजुन तीन साथीदार आरोपी फरार आहेत.  सध्यस्थितीत आरोपीकडून ४५ तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने, २ लॅपटॉप, १ कॅमेरा, ३ एलईडी टिव्ही, ३ मोबाईल असा १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
   पोलीस उपनिरीक्षक राधिका मुंडे व गुन्हे शोध पथकाचे श्रीशैल कंटोळी, अमोल कसबेकर, समीर करे, पोलीस कॉन्स्टेबल जयराज देवकर, प्रशांत खुटेमाटे, संतोष दावलकर, शरद वारे, मनोज मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: 15 house breaking accussed arrsted at Lonavla; 15 lakhs materials seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.