एटीएममध्ये भरण्यासाठीच्या ७४ लाख रक्कम व वाहनासह चालक फरार; राहटणीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:44 PM2018-01-31T18:44:55+5:302018-01-31T18:48:37+5:30
एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी कॅश व्हॅनमधून आणलेले ७४ लाख रुपये घेऊन वाहन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि ३१) दिवसा ढवळ्या दुपारी दोनच्या सुमारास अॅक्सिस बँकेच्या कोकणे चौकातील शाखेमध्ये घडली.
पिंपरी-चिंचवड (वाकड) : एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी कॅश व्हॅनमधून आणलेले ७४ लाख रुपये घेऊन वाहन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि ३१) दिवसा ढवळ्या दुपारी दोनच्या सुमारास अॅक्सिस बँकेच्या कोकणे चौकातील शाखेमध्ये घडली.
याप्रकरणी शाखा व्यवस्थापक शिवदत्त खाडे यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली असून रणजित धर्मराज कोरेकर (वय ३२, रा. दिघी) या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरतील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी व देखभालीचे कामे एका एजन्सीला देण्यात आले आहे त्यानुसार आज दुपारी रहाटणी येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेमध्ये असलेल्या एटीएममध्ये भरण्यासाठी ७४ लाखांची रोकड घेऊन व्हॅन आली पैसे भरण्यासाठी वाहनातील सुरक्षारक्षक खाली उतरताच व्हॅन चालकाने व्हॅनसहित ७४ लाखांची रोकड घेऊन पळ काढला कोनाला काही कळण्याच्या आत वाहन दिसेनासे झाले.
वाकड व सांगवी पोलीस परिसरातील सीसीटीव्हीद्वारे तपास करीत आहेत.