देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या मिनी बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, 16 प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 09:42 AM2017-10-28T09:42:51+5:302017-10-28T09:45:01+5:30
देवदर्शनाकरीता निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात 16 जण जखमी झाले आहेत.
लोणावळा : देवदर्शनाकरीता निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात 16 जण जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास उर्से टोलनाक्याजवळ ओझर्डे या गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. जखमींपैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार टुअर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीची मिनी बस (MH 04 GP 1690) ही ठाण्याहून जेजुरीला प्रवासी घेऊन जात असताना ओझर्डे गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकाला धडकली. या अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक महामार्ग पोलीस व खासगी रुग्णवाहिकांमधून जखमींना रुग्णालयात उपचारसाठी पाठवण्यात आले.