कुदळवाडी परिसरात पुन्हा अग्नितांडव :फर्निचर दुकानासह हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 18:14 IST2019-03-19T18:11:14+5:302019-03-19T18:14:49+5:30
कुदळवाडी परिसरात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये जिवितहानी झाली नसली तरीही, लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे अग्निशामक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

कुदळवाडी परिसरात पुन्हा अग्नितांडव :फर्निचर दुकानासह हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी
तळवडे : कुदळवाडी परिसरात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये जिवितहानी झाली नसली तरीही, लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे अग्निशामक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
चिखली कुदळवाडी येथील इंद्रायणी वजन काटा परिसरात मंगळवार (दि.१९) पहाटेच्या सुमारास फर्निचर दुकान व हॉटेलला आग लागली असल्याची माहिती विलास यादव यांनी अग्निशामक विभागाला दिली. आगीमध्ये बरकत अली, राजेश शर्मा, पंडित वाघ, नेहाल खान यांची ३ फर्निचर व १ हॉटेल आगीत जळून नुकसान झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत आग आटोक्यात आणलीआगीच्या लोळातून दोन एलपीजी सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठी हानी टळली. यावेळी मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, उप अग्निशमन केंद्र चिखली, तळवडे व भोसरी अशा चार अग्निशमन केंद्रातील कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी दाखल झाले होते.