काळेवाडी-आळंदी बीआरटी प्रकल्प मार्गी, स्थायी समितीत विकास कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 03:24 AM2018-01-07T03:24:35+5:302018-01-07T03:24:42+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा झाली. त्यात काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटी मार्गासाठीच्या विषयासह शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३८ कोटी ६५ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा झाली. त्यात काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटी मार्गासाठीच्या
विषयासह शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ३८ कोटी ६५ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. विषयपत्रिकेवर ७३ विषय होते. त्यांपैकी अवलोकनाचे १३, तहकूब ९ विषय करण्यात आले. तर ६० विषय मंजूर करण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण, बीआरटी मार्ग, मलनि:सारण, पंप हाऊस देखभाल-दुरुस्ती, रावेत-किवळे येथे मुख्य जलनि:सारण नलिका टाकण्याच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर ऐन वेळेसचे विषयही सभेत मंजूर करण्यात आले.
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी या बीआरटीएस कॉरिडॉर गँट्री करणेकामी येणाºया सुमारे एक कोटी ६६ लाख १४ हजार रुपयांच्या खर्चास, कासारवाडी फेज १
करिताचे मैलापाणी पंप हाऊस काळेवाडी व पिंपळे सौदागर पंप हाऊसचे वार्षिक चालन देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणाºया सुमारे एक कोटी ४८ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता
देण्यात आली.
केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन रस्त्याचे काम
चिंचवड एस.बी.आर. मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणाºया मैला पंप हाऊसचे चालन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी (गोखले पार्क, काकडे पार्क, केशवनगर, देऊळमळा) येणाºया सुमारे दोन कोटी ३५ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास, केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी येणाºया सुमारे एक कोटी ९४ लाख १३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जलनि:सारणाची कामे करणार
विविध विकासकामांच्या विषयावर चर्चा झाली. प्रभाग क्र. ३१ दिघीमधील साई पार्क, आदर्शनगर, कृष्णानगर, भारतमातानगर इत्यादी ठिकाणीचे उर्वरित रस्ते डांबरीकरण करण्यासाठी येणाºया सुमारे ७० लाख ६३ हजार रुपयांच्या खर्चास, रावेत मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत मामुर्डी, किवळे, रावेत या उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकणे व जलनि:सारणविषयक कामे करण्यासाठी येणाºया सुमारे ७० लाख ५९ हजार रुपयांच्या खर्चास, रावेत मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत रावेत, किवळे येथे मुख्य जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी येणाºया सुमारे ९५ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.