शहरासाठी सरसावले कलाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 05:46 AM2017-11-13T05:46:49+5:302017-11-13T05:47:32+5:30

शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदवत शहराला सुंदर बनविण्यासाठी लोणावळ्यातील कलाकारांनी (आर्टिस्ट ग्रुप) पुढाकार घेतला  आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या नगर परिषद मालकीच्या,  तसेच खासगी मालमत्ताधारकांच्या भिंती रंगवत त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारा उद्बोधक संदेश व चित्र रंगविण्याचे काम कलाकारांची ही टीम करणार आहे.

Artists who come to the city | शहरासाठी सरसावले कलाकार

शहरासाठी सरसावले कलाकार

Next
ठळक मुद्देसुंदर, स्वच्छ लोणावळा भिंतीवरील चित्र, संदेशाद्वारे जनजागृती करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदवत शहराला सुंदर बनविण्यासाठी लोणावळ्यातील कलाकारांनी (आर्टिस्ट ग्रुप) पुढाकार घेतला  आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या नगर परिषद मालकीच्या,  तसेच खासगी मालमत्ताधारकांच्या भिंती रंगवत त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारा उद्बोधक संदेश व चित्र रंगविण्याचे काम कलाकारांची ही टीम करणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त, तसेच निर्मल करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, स्वच्छता व आरोग्य सभापती पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छतेबाबतची कामे व प्रबोधन मोहीम सुरू आहे. नगर परिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी, शहरातील विविध सामाजिक संस्था व जागरूक नागरिक, तसेच मान्यवर मंडळींनी यामध्ये पुढाकार घेत झोपडपट्टी ते उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती सुरू केली आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, ओला व सुका कचरा कोणता व तो वर्गीकरण कसा करावा, सुक्या कचर्‍यापासून घरच्या घरी खतनिर्मिती, कचरा निर्माण होणार नाही याकरिता काय करावे अशी माहिती देण्याचे काम सर्व स्तरावर सुरू आहे. 
शहराच्या मध्यवर्ती भागात, तसेच मुख्य रस्त्याकडेला नगर परिषदेच्या, तसेच खासगी मालमत्ताधारकांच्या अनेक भिंती आहेत. त्या सर्व भिंती रंगवत त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारे उद्बोधक वाक्य व चित्र रंगविण्यात येणार आहे. शहरातील आर्टिस्ट ग्रुपने यामध्ये पुढाकार घेतला असून, या उपक्रमात सर्व हौशी कलाकारांनी, कला शिक्षकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कामाकरिता लागणारे रंग व इतर सर्व साहित्य नगर परिषद पुरविणार आहे. हौशी कलावंत व शाळांमधील चित्रकलेचे विद्यार्थी हे देखील 
यामध्ये सहभाग नोंदवू शकतात. 
त्यांनी सहभागाकरिता मुख्याधिकारी सचिन पवार, कला शिक्षक 
राजेंद्र दिवेकर, संजय गोळपकर, 
सचिन कुटे, संजोग पिसे, सागर तावरे, विशाल केदारी, नितीन तावरे, 
प्रमोद प्रांचाळ, हनुमंत वाघमारे, चंद्रकांत जोशी, दत्ता थोरात आदीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवोदित कलाकारांना यामधून आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या रंगकामामुळे शहरात येणारे पर्यटक व नागरिक यांनाही स्वच्छतेचे महत्त्व समजणार आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून रस्त्याच्या कडेला ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो अशा भागातील भिंती रंगवत त्यावर प्रबोधनपर संदेश लिहिण्यात येणार आहेत.

Web Title: Artists who come to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.