बीआरटीसाठी पदाधिका-यांची टूर, अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:25 AM2017-08-24T04:25:00+5:302017-08-24T04:25:25+5:30
पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी बीआरटीएस प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला असून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी तीन टप्प्यांमध्ये अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी बीआरटीएस प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला असून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी तीन टप्प्यांमध्ये अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार आहेत. त्यास खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
वाढती लोकसंख्या आणि वाहन संख्या विचारात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेने १० रस्त्यांवर बीआरटीएस वाहतूक सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. रेंगाळलेले बीआरटीचे मार्ग सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने केंद्राच्या शहरी विकास विभागाच्या सूचनेवरून जागतिक बँक आणि एसयुटीपी यांच्या वतीने राष्ट्रीय बीआरटीएस गोलमेज परिषद घेतली होती. या परिषदेला महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतींसह पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाºयांना बीआरटीची अधिक माहिती मिळावी म्हणून अहमदाबाद अभ्यास दौºयाचे
आयोजन केले. त्यानुसार सार्वजनिक वाहतूक यावर अहमदाबादचे शिवानंद स्वामी यांनी अडीच दिवसांच्या कार्यशाळेचे नियोजन केले आहे. या अभ्यास दौºयासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका आणि महापालिका अधिकाºयांना निमंत्रित करण्यात आले आहे.