खडकीत घरफोडी; २५ तोळे सोन्यासह रोकड लंपास, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 02:52 PM2018-02-07T14:52:53+5:302018-02-07T14:56:45+5:30
कुटुंबासह शिर्डीला देवदर्शनाला गेलेल्यांच्या घरावर पाळत ठेऊन चोरट्यांनी २६ तोळे सोने आणि २५ हजार रुपए रोकड पळवुन नेली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. खडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी : कुटुंबासह शिर्डीला देवदर्शनाला गेलेल्यांच्या घरावर पाळत ठेऊन चोरट्यांनी २६ तोळे सोने आणि २५ हजार रुपये रोकड पळवून नेली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. खडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजीत मित्रा कुटूंबासह शिर्डीला दर्शनासाठी गेले. खडकीतील आॅर्डनन्स फॅक्टरीत ते नोकरीस आहेत. त्यांच्याकडे काही पाहुणे आले. पाहुण्यांना घेऊन कुटुंबीयांसह ते घर बंद करून ते शिर्डीला निघून गेले. आॅर्डनन्स फॅक्टरीजवळील त्यांच्या घरावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी बुधवारी पहाटे घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील दागिने तसेच रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पलायन केले.
शिर्डीहून परत आल्यानंतर विश्वजीत यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरातील सााहित्य अस्ताव्यस्त पडले होते. कपाट उघडे होते. कपाटातील साहित्य बाहेर पडले होते. किंमती वस्तू दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. खडकी पोलिसांकडे धाव घेऊन त्यांनी चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यकत केला आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात विश्वजीत मित्रा यांनी फिर्याद दिली असून खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.