एटीएममधून सव्वा कोटीचा अपहार, दोघांना अटक, खडकी पोलिसांकडे गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 03:57 AM2017-11-27T03:57:19+5:302017-11-27T03:57:31+5:30
गोपनीय पासवर्डचा वापर करून सत्संग भवन खडकी परिसरातील विविध बँकांच्या १७ एटीएममधून सुमारे एक कोटी ३५ लाख ३४ हजार ७०० रुपये रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
पिंपरी : गोपनीय पासवर्डचा वापर करून सत्संग भवन खडकी परिसरातील विविध बँकांच्या १७ एटीएममधून सुमारे एक कोटी ३५ लाख ३४ हजार ७०० रुपये रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. एटीएम केंद्रात सेवा पुरविणाºया कंपनीशी संबंधित कर्मचाºयांनी या रकमेचा अपहार केला असून दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेशकुमार पिल्ले (वय ३९, रा. ठाणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी सेक्युरी ट्रान्स अंडिया प्रा. लि. दिल्ली या कंपनीत एटीएम आॅपरेशन्स म्हणून काम करतात. तर अभिजीत संजय गोसावी (वय २१, लाखेवाडी, इंदापूर), अविनाश अशोक कांबळे (वय ३४,रा. औंध) या दोन आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी पिल्ले यांनी कंपनीच्या या कंपनीतर्फे सेवा पुरविण्यात येणाºया खडकी पुणे येथील एटीएम केंद्रांची आॅडिटरमार्फत माहिती घेतली असता, त्या शाखेत काम करणाºया कामगारांनी २१ पैकी १७ एटीएम केंद्रांवर पासवर्डचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले. शिनू राजकुमार सिंधू सालादल्लू (रा. पिंपळे गुरव) याच्याशी संगनमत करून दोन कर्मचाºयांनी मोठ्या रकमेचा अपहार केला असल्याचे फिर्यादीने पोलिसांना कळविले आहे.
हॉटेलातील कार्ड स्वाईप यंत्राचा दुरूपयोग
पिंपरी : हॉटेलचे बिल अदा करताना स्वाईप मशिनवर के्रडिट अथवा डेबिट कार्डचा वापर केल्यानंतर तेथील कामगार ग्राहक ज्या वेळी कार्डचा पासवर्ड दाबतो, त्या वेळी लक्ष ठेवून नंतर काही वेळाने हा पासवर्ड क्रमांक कागदावर लिहून ठेवतात. नंतर त्या क्रमांकाच्या आधारे गोपनीय माहिती मिळवून दुरुपयोग करतात. असाच प्रकार हिंजवडीत शनिवारी घडला असून, विकी रामअवतार अगरवाल (वय ३६, रा. कोंढवा, पुणे) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पाटील (वय ३७, रा. हिंजवडी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. हिंजवडीतील शिवाजी चौकात एका हॉटेलात येणाºया ग्राहकांचे डेबिट आणि के्रडिट कार्डचे पासवर्ड क्रमांक हॉटेलच्या गल्ल्यावर रोखपाल म्हणून काम करणाºया कर्मचाºयाने लिहून ठेवले. केवळ ग्राहकच नाही तर हॉटेलमध्ये काम करणाºया सहकारी कर्मचाºयांचेही डेबिट, क्रेडिट कार्डचे क्रमांक त्याने लक्ष देऊन मिळविले.
ग्राहक ज्या वेळी मशिनमध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड ठेवून पासवर्ड क्रमांक देतात. त्या वेळी लक्ष देऊन रोखपाल ग्राहक कोणते क्रमांक दाबतो, हे लक्षात ठेवतो. थोड्या वेळाने हे क्रमांक तो दुसºया वहीत लिहून ठेवतो. नंतर या क्रमांकाच्या आधारे ग्राहकांची गोपनीय माहिती मिळवून ती अन्य ठिकाणी वापरून त्याने अनेकांची फसवणूक केली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आरोपीविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.