अनधिकृत फ्लेक्स उभारणा-यांवर फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:21 AM2017-08-02T03:21:42+5:302017-08-02T03:21:42+5:30
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फ्लेक्स व जाहिरात फलकांना परवानगी दिली जाते. विना परवाना व अनधिकृत फ्लेक्स उभारणाºयांवर आता फौजदारी कारवाई केली जाणार आहे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फ्लेक्स व जाहिरात फलकांना परवानगी दिली जाते. विना परवाना व अनधिकृत फ्लेक्स उभारणाºयांवर आता फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असा इशारा आकाशचिन्ह परवाना विभागाने दिला आहे.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र महापालिका अधिनियम २४४ व २४५ तसेच महाराष्ट्र महापालिका जाहिरात नियमावली २००३ चे नियमानुसार आकाश चिन्ह उभा करणे पूर्वी महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता असते. स्थायी समिती सभेत अनधिकृत फ्लेक्सचा मुद्दा गाजला होता. त्या वेळी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी संबंधित विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. शहरातील अनधिकृत आणि अनधिकृत फ्लेक्स किती याची माहिती विचारली होती. तसेच या विभागाच्या उत्पन्न वाढीसाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले जाऊ शकतात. याविषयी संबंधित विभागाला सूचना केल्या होत्या. तसेच महापालिकेचे उत्पन्न बुडविणाºयांवर कारवाई करावी, असेही निर्देश दिले होते. त्यानंतर आकाशचिन्ह परवाना विभागास जाग आली आहे.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जाहिरात फलक, होर्डिंग, किआॅक्स व इत्यादी लावायचा असेल तर अर्ज नागरी सुविधा केंद्रा मार्फत करणे आवश्यक आहे. अर्ज, स्थळ दर्शक नकाशा, जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, इमारत, जागेचे मालकी हक्काबाबत पुरावा, संरचना अभियंता यांचेकडील स्ट्रक्चर स्टॅबिलीटी प्रमाणपत्र, वृक्ष संवर्धन विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र, जाहिरातदाराचे हमी पत्र, जाहिरात फलक इमारतीवर लावणार असलेस इमारत पूर्णत्वाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.