मोगलाई ! भर बाजारपेठेत सशस्त्र टोळक्याकडून दहशत माजवत अडीच लाखांची लुट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:56 PM2018-07-20T12:56:25+5:302018-07-20T13:09:16+5:30

देडूरोड बाजारपेठेत गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास पाच सहा दुचाकींवरुन आलेल्या 10 -12 जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन दुकानांची तोडफोड करुन सुमारे अडीच लाखांची रोकड लुटली असून दोन्ही दुकानांचे मालक, त्यांचा एक मुलगा, एक  नोकर असे चौघांना जखमी केले आहे.

Dehu road market shopkeeper are suffered from weapon boys gang | मोगलाई ! भर बाजारपेठेत सशस्त्र टोळक्याकडून दहशत माजवत अडीच लाखांची लुट  

मोगलाई ! भर बाजारपेठेत सशस्त्र टोळक्याकडून दहशत माजवत अडीच लाखांची लुट  

Next
ठळक मुद्देदेहूरोड येथील गुरुवार रात्री नऊची घटना दुकानदारांसह चार जखमी, मोटार, रिक्षा, दुचाकीचीही तोडफोड

देहुरोड : देडूरोड बाजारपेठेत गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास पाच सहा दुचाकींवरुन आलेल्या 10 -12 जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन दुकानांची तोडफोड करुन सुमारे अडीच लाखांची रोकड लुटली असून दोन्ही दुकानांचे मालक, त्यांचा एक मुलगा, एक  नोकर असे चौघांना जखमी केले  असून टोळक्याने एक मोटार , एक रिक्षा, दुचाकीची तोडफोड करुन रस्त्याने चाललेल्या दोन पादचाऱ्यांना जखमी केल्याची माहिती मिळाली आहे.

         दुकानात असलेल्या सुरेश बन्सल ( वय 47 ) , कपिल बन्सल ( वय 38 ), रोहन सुरेश बन्सल ( वय 23) सर्व राहणार देहुरोड, पुणे हे तिन्ही दुकानदार तसेच मोहन रूपसिंग कुशवाह  ( वय 22) राहणार शिवाजीनगर, देहुरोड, पुणे असे दुकानातील नोकराचे  नाव असून सर्वजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार देहुरोड बजारपेठेतील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुलाजवळ असलेल्या ओम सुपर मार्केट ( गजानन ऑइल डेपो ) तसेच पूजा जनरल स्टोअर्स या डॉन दुकानांत ग्राहकांची गर्दी असताना अचानक सशस्त्र टोळक्याने दुकानात घुसून थेट तोडफोड करण्यास सुरुवात केली तसेच गल्ल्यातील अनुक्रमे सुमारे दीड लाख व् एकलाख असे एकूण अडीच लाखांची रोकड लुटुन नेली आहे.

           ओम सुपर मार्केट या दुकानात असलेल्या सुरेश बन्सल , रोहन बन्सल व मोहन कुशवाह  यांना शस्त्राने मारहाण करुन जखमी केले असून दुकानातील गल्ल्यात असलेली सुमारे दीड लाखाची रोकड नेली आहे. तसेच पूजा जनरल स्टोअर्स या दुकानाची तोडफोड करुन कपिल बन्सल यांना जखमी करुन त्यांच्या दुकानातील एक लाखाची रोकड लुटून नेली आहे. टोळक्याने मुमुख्य रस्त्यावरुन येताना रस्त्यावर उभी असलेली एक मोटार , एक रिक्षा , एक दुचाकीची तोडफोड केली असून पायी चालणाऱ्या दोन पादचाऱ्यांना जखमी केले असल्याची माहिती मिळाली आहे

 

Web Title: Dehu road market shopkeeper are suffered from weapon boys gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.