चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा १७ जणांना चावा; २२ दिवसात १०२ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:05 PM2018-01-23T15:05:36+5:302018-01-23T15:07:15+5:30

पिसाळलेल्या कुत्र्याने आज चिंववडगावात धुमाकूळ घालत सतरा जणांचा चावा घेतल्याची घटना घडली. या मुळे चिंचवडमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

dogs bite, 17 injured in Chinchwad; 102 injured in 22 days | चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा १७ जणांना चावा; २२ दिवसात १०२ जण जखमी

चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा १७ जणांना चावा; २२ दिवसात १०२ जण जखमी

Next
ठळक मुद्देपिसाळलेल्या कुत्र्याने घातला धुमाकूळ, नागरिकांमध्ये भितीचे वातावरणजानेवारी महिन्यात चिंचवड परिसरातील १०२ नागरिकांना कुत्र्याने चावल्याची नोंद

चिंचवड : पिसाळलेल्या कुत्र्याने आज चिंववडगावात धुमाकूळ घालत सतरा जणांचा चावा घेतल्याची घटना घडली. या मुळे चिंचवडमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
रात्री उशिरापर्यंत गावातील कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन या कुत्र्याचा शोध घेत होते. सायंकाळी पाच वाजल्यापासून चिंचवडमधील तानाजीनगर, केशवनगर, काकडेपार्क, गांधीपेठ, धनेश्वर मंदिर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. रस्त्यात दिसणाऱ्या नागरिकांना चावा घेत जखमी केले. यात आठ लहान मुलांचा समावेश आहे. यातील अनेकांना उपचारासाठी पालिकेच्या तालेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
जानेवारी महिन्यात चिंचवड परिसरातील १०२ नागरिकांना कुत्र्याने चावल्याची नोंद पालिकेच्या तालेरा रुग्णालयात झाली आहे.
चिंववड गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेत जखमी केले असल्याची बातमी परिसरात पसरली. तानाजीनगर, केशवनगर भागात या कुत्र्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक सैरावैरा पळत होते. इतर कुत्री यांच्या मागे भुंकत असल्याने चवताळलेल्या या कुत्र्याने दिसेल त्याच्या अंगावर धाव घेतली.
रात्री उशिरापर्यंत या कुत्र्याच्या हल्ल्यात १४ जण जखमी झाले. रात्री नऊ वाजता धनेश्वर मंदीर परिसरात या कुत्र्याने ३ जणांवर हल्ला केला. या वेळी परिसरातील अनेक कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन या कुत्र्याचा शोध घेत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत या कुत्र्याचा शोध लागला नाही. चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांचा वावर सध्या वाढला आहे. अनेक रस्त्यावर कुत्री भटकत असल्याचे वास्तव सध्या दिसत आहे. या पूर्वीही एकाच दिवसात २१ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केल्याची घटना घडली आहे. मात्र पालिका प्रशासनाला या बाबत गांभीर्य नसल्याने उपाययोजना केल्या जात नाहीत. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा काम करत नसल्याने अशा कुत्र्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले लक्षात घेऊन योग्य उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
भटक्या कुत्र्यांबाबत योग्य नियोजन होत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Web Title: dogs bite, 17 injured in Chinchwad; 102 injured in 22 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.