पिंपरीत बोगस वकिलांचा वाढलाय वावर, परप्रांतीय व्यक्तींच्या सहभागाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 04:35 AM2017-08-23T04:35:33+5:302017-08-23T04:36:02+5:30

आॅल इंडिया बार कौन्सिलकडे नोंदणी नाही़ वकिली व्यवसायाची सनद न मिळविता, राजरोसपणे न्यायालयात परिसरातील बोगस वकिली करणारे वकील संघटनेलाही शिरजोर झाले आहेत. वकिली व्यवसाय हा प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे़

 Due to the increased violence of bogus lawyers, suspicion of the involvement of parasitists | पिंपरीत बोगस वकिलांचा वाढलाय वावर, परप्रांतीय व्यक्तींच्या सहभागाचा संशय

पिंपरीत बोगस वकिलांचा वाढलाय वावर, परप्रांतीय व्यक्तींच्या सहभागाचा संशय

Next

पिंपरी : आॅल इंडिया बार कौन्सिलकडे नोंदणी नाही़ वकिली व्यवसायाची सनद न मिळविता, राजरोसपणे न्यायालयात परिसरातील बोगस वकिली करणारे वकील संघटनेलाही शिरजोर झाले आहेत. वकिली व्यवसाय हा प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे़ मात्र त्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल अशी वर्तणूक करणाºया वकिलांचा वावर वाढत चालला आहे. पायात बुटाऐवजी चप्पल, कळकट, मळकट कपडे घालून काही परप्रांतिय व्यक्ती वकील म्हणून वावरतात. त्यांना हटकणाºया वकील संघटनेच्या पदाधिकाºयांनाही ते जुमानत नसल्याचे चित्र आहे.
मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास एक परप्रांतिय व्यक्ती पिंपरी न्यायालयाच्या आवारात हातात कागद घेऊन फिरत होता. पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बारचा सदस्य नसलेली ही व्यक्ती कळकट, मळकट गणवेशात, पायात चपला घालून वावरताना दिसून आली. त्या व्यक्तीस अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी हटकले. मात्र ‘‘मी बार कौन्सिलची सनद मिळवली आहे़ तुम्ही मला अडवू शकत नाही’’असे म्हणत हातातील कागद तो दाखवू लागला. सनद मिळवली असली तरी अशा पद्धतीने सनद हातात घेऊन फिरणे योग्य नाही. न्यायालयात येत असताना, गणवेश कसा असावा, पायात बूट असावेत, असा वकिली व्यवसायाच्या आचारसंहितेतील नियम आहे. निदान त्याचे तरी पालन करावे, असे अ‍ॅडव्होकेट बासर असोसिएशनचे अध्यक्ष किरण पवार यांनी त्याला समजून सांगितले.
पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असाल तर या अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे सदस्य होता येईल, कोणत्याही ठिकाणी व्यवसाय करा, व्यावसायिक आचारसंहितेचे पालन करणे आवश्यकच आहे. मात्र या महाशयांनी मला कोणी शहाणपण शिकवू नये, असे म्हणत तेथून काढता पाय घेतला.

- गतवर्षी शर्मा नामक एका व्यक्तीने अशाच पद्धतीने पिंपरीतील वकील संघटनेला नाकीनऊ आणले होते. या शर्माकडे तर आॅल इंडिया बार कौन्सिल अथवा बार कौन्सिल आॅफ महाराष्टÑ अशी कोणत्याच कौन्सिलची सनद नाही. तरीही तो राजरोसपणे न्यायालय परिसरात येत होता. त्याच्यावर गुन्हे दाखल असून काही दिवसांसाठी तो तुरुंगाची हवा खाऊन आलेला आहे. या महाशयाने तर त्याला हटकणाºया पदाधिकाºयांविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यापर्यंतची मजल मारली आहे. न्यायालयात ज्यावेळी मी बोगस वकील असल्याचे सिद्ध होईल, तेव्हाच मी न्यायालयात येणे बंद करेल, असे आव्हानच त्याने वकील संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले आहे.

Web Title:  Due to the increased violence of bogus lawyers, suspicion of the involvement of parasitists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :advocateवकिल