चिंचवडमध्ये पाच वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, सजग नागरिकांमुळे झाला बचाव
By रोशन मोरे | Published: September 4, 2023 08:42 AM2023-09-04T08:42:59+5:302023-09-04T08:44:11+5:30
पिंपरी : पाच वर्षांची मुलगी खेळत असताना आपल्या घरापासून लांब गेली. त्यावेळी खाऊचे अमिष दाखवून तिला एक तरुण सोबत ...
पिंपरी : पाच वर्षांची मुलगी खेळत असताना आपल्या घरापासून लांब गेली. त्यावेळी खाऊचे अमिष दाखवून तिला एक तरुण सोबत घेऊन चालला होता. मात्र, रस्त्याने चालणाऱ्या दोन नागरिकांना शंका आल्याने ते त्याला ते पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यावेळी ती मुलगी त्याची परिचयाची नसल्याचे समोर आले. ही घटना शनिवारी (दि.२) चिंचवड येथे घडली. या प्रकरणी प्रकरणी मुलीच्या आईने चिंचवडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित राजदीप रामआसारे राजपुत (वय २३, रा.थेरगाव, मुळगाव- मिरापुर, कोसंबी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पाच वर्षीय मुलीला घराबाहेर खेळण्यास सोडून तिची आई सत्संगासाठी गेली होती. मुलगी खेळताना घरापासून लांब गेली. तिला संशयित राजदीप याने खाऊचे आमिष दाखवून आपल्यासोबत घेऊन जात होता. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या दोन सजग नागरिकांना त्याचा संशय आला. ते त्याला आणि मुलीला घेऊन चिंचवड पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे.