उलगडला गुरू-शिष्याचा सांगीतिक प्रवास
By admin | Published: February 15, 2017 02:08 AM2017-02-15T02:08:43+5:302017-02-15T02:08:43+5:30
महान गायक किशोर कुमार आणि सुप्रसिद्ध गायक कुमार सानू या गुरू शिष्याच्या नातेसंबंधाचे विविध संगीतमय पैलू उलगडून
पिंपरी : महान गायक किशोर कुमार आणि सुप्रसिद्ध गायक कुमार सानू या गुरू शिष्याच्या नातेसंबंधाचे विविध संगीतमय पैलू उलगडून दाखविणारा सुंदरसा कार्यक्रम चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. सुमधूर गाण्यांनी बहरलेली ही रविवारची संध्याकाळ रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली.
लोकमत सखी मंच व ज्ञानश्री प्रस्तुत गुरू-शिष्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून किशोर कुमार आणि कुमार सानू यांच्या गुरू-शिष्यांच्या नात्यातील सांगितिक प्रवास गीतांद्वारे रसिकांसमोर मांडण्यात आला. गायिका कोमल कलाकिया व प्रिया जोशी यांनी त्यांच्या अप्रतिम गायकीने सांगितिक मैफलीत रंगत आणली. गायक प्रशांत एन. जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
चिंचवडच्या स्वर आलाप ग्रुपने व प्रशांत साळवीच्या टीमने कोरस दिले. नासिर खान यांनी निवेदन केले. बाबा खान, मुकेश देढीया, केदार मोरे, विजय मूर्ती, अभिजीत भरे, अजय अत्रे, अमृता ठाकूरदेसाई, मिहीर भडमकर, रोहित साने यांनी साथसंगीत केली. सखींनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. असा हा सांगितिक कार्यक्रम वारंवार घेण्यात यावा, अशी मागणीवजा विनंती सखींकडून करण्यात आली.
(प्रतिनिधी)