हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:57 AM2017-07-29T05:57:47+5:302017-07-29T05:57:50+5:30

हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते.

hainjavadaita-samasayaancai-daokaedaukhai | हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी

हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी

Next

पिंपरी : हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अथवा खासगी बस सुविधा सक्षम नाही. त्यामुळे ते स्वत:ची चारचाकी घेऊन कंपनीत जाण्यास प्राधान्य देतात. दुचाकी घेऊन जाणाºयांना हेल्मेटशिवाय कंपनीत प्रवेश दिला जात नाही. हेल्मेटशिवाय गेल्यास कंपनीच्या प्रवेशद्वारावरच दुचाकी स्वत:च्या जोखमीवर ठेवावी लागते. त्यामुळे चारचाकी वापरणे हाच पर्याय ते निवडतात. परिणामी सकाळी कंपनीत जाण्याच्या वेळी आणि सायंकाळी कंपनी सुटतेवेळी हिंजवडी, वाकड रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. ही वाहतूककोंडी सद्या डोकेदुखी ठरू लागली आहे.
हिंजवडी आयटीपार्कमध्ये काम करणारे अनेक जण बावधन, पाषाण, वाकड, ताथवडे, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर आणि सांगवी परिसरातील राहणारे आहेत. त्यामुळे आयटी कंपन्या सुटण्याच्या वेळी हिंजवडी, वाकड आणि मुंबई -बंगळुरू महामार्गावर ताथवडे, वाकड परिसरात मोटारींच्या रांगा लागतात. एवढेच नव्हे तर नेरे आणि मारुंजी या आतील भागातील गावठाण रस्त्यांवरही वाहतूककोंडीचा परिणाम जाणवतो. आयटी कंपन्यांची सुद्धा अभियंत्यांसाठी वाहन सुविधा आहे. दूर अंतरावर राहणारे कंपनीच्या बससेवेचा लाभ घेतात. तसेच खासगी वाहतूक सुविधा सुरक्षित नसल्याने अभियंता तरुणी कंपनीच्या बसचा वापर करतात. जवळपास राहाणारे आयटी अभियंते स्वत:च्या मोटारी घेऊन कंपनीत जातात. स्वत:च्या मोटारी वापरण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे हिंजवडीतील वाहतूक समस्येत आणखी भर पडली आहे.

हिंजवडी व वाकड येथून मुंबई -बंगळुरू महामार्ग जातो. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ आहे. वाकड पूल आणि हिंजवडी येथे सततच्या वाहतूककोंडीमुळे अपघात घडण्याचे प्रमाणही अधिक आहे. हा परिसर केवळ आयटीयन्सनाच नव्हे तर अन्य नागरिकांसाठीही असुरक्षित ठरू लागला आहे. येथील वाहतूककोंडी टाळायची असेल तर पर्यायी मार्गही नाही. हिंजवडी, वाकड, माण, मारुंजी या परिसरातून अंतर्गत रस्त्याने गेले तरी वाहनांची वर्दळ दिसून येते.

वाहतूककोंडी टाळण्यासाठी सकाळी ७ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ यावेळेत वाहतूक कर्मचारी तैनात असतात. याशिवाय सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत या हद्दीतील सर्वच सिग्नल बंद केले जातात. हातवारे करून वाहतुकीचे नियमन केले जाते. यावेळेत कारवाई करण्यास मुभा नाही. महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या चौकात अतिरिक्त कर्मचाºयांची नेमणूक असते. दुचाकीसाठी स्वतंत्र लेन असून बस आणि मोटारसाठीही वेगळा ट्रॅक आहे. मात्र आणखी एक स्वतंत्र लेन करण्यासाठी दीडशे कर्मचारी, ५ वॉर्डन आणि २५ जॅमरची अशी यंत्रणा गरजेची आहे. तशी मागणी वाहतूक विभागाकडे नोंदवली आहे.
- दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक (हिंजवडी वाहतूक विभाग)
 

Web Title: hainjavadaita-samasayaancai-daokaedaukhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.