विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:27 AM2017-08-07T03:27:22+5:302017-08-07T03:27:22+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट अधिकाºयांची चौकशी करण्याबाबत महापालिका आयुक्तांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल देण्याबाबत विभागीय आयुक्तांनी आदेश दिले होते; मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत असमर्थता व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट अधिकाºयांची चौकशी करण्याबाबत महापालिका आयुक्तांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल देण्याबाबत विभागीय आयुक्तांनी आदेश दिले होते; मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत असमर्थता व्यक्त केली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. याप्रकरणी योग्य कार्यवाही आणि कारवाई करावी, अशी मागणी भाजपाकडून होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत होत आहे. भाजपाचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्यांनी विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित अधिकारी हे वर्ग एकचे अधिकारी आणि काही अधिकारी शासनसेवेतील असल्याने चौकशी करण्याबाबत आयुक्तांनी असमर्थता दर्शविली होती. याबाबत कार्यवाही झालेली नाही. अमोल थोरात म्हणाले, ‘‘महापालिका प्रशासनातील काही अधिकारी भ्रष्ट असून, काही अधिकाºयांची कार्यशैली संशयास्पद आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे भाजपाला पारदर्शी कारभार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातील भ्रष्ट आणि संशयास्पद कार्यशैली असलेल्या अधिकाºयांची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. याबाबत मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी या निवेदनाची दखल घेत त्याबाबत कार्यवाही करण्याबाबत महापालिका आयुक्त यांना आदेश दिले होते. प्रादेशिक उपसंचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांनी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले; मात्र महापालिका आयुक्तांनी आदेशाला न जुमानता संबंधित अधिकाºयांची चौकशी करण्याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनातील संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. महापालिका प्रशासनातील अनेक जण लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. यावरून महापालिका प्रशासनातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.
महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांकडून अनागोंदी कारभार करण्यात येतआहे. ही बाब निदर्शनास आणून
दिली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून अर्थात विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडून संबंधित अधिकाºयांच्या चौकशीचे आदेश असतानाही आयुक्तांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
भाजपात गटबाजी
महापालिकेतील भाजपात गटबाजी आहे. काहीजण मनमानी कारभार करीत असल्याबद्दलही भाजपाच्या पदाधिकाºयांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. थोरात म्हणाले, ‘‘भाजपाचा भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभारावर भर आहे. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे. जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसून कारभारात सुसूत्रता येईल; मात्र महापालिका प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी अनागोंदी कारभार करीत आहेत. भ्रष्टाचार करून चुकीची कामे करीत आहेत.’’
संपत्तीची चौकशी करा
४लाच स्वीकारताना सात महिन्यांत सहा जणांना रंगेहाथ पकडले आहे. असे असतानाही आयुक्त अशा भ्रष्ट, बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाºयांना पाठीशी घालत आहेत. महापालिका आयुक्तांनी संबंधित भ्रष्ट अधिकाºयांची सखोल चौकशी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांचाही बेजबाबदारपणा यातून दिसून येत आहे. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही आणि कारवाई करावी. तक्रार केलेल्या अधिकाºयांची संपत्ती तपासावी, अशी थोरात यांनी केली आहे.