चापेकर वाड्याचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:50 AM2017-08-03T02:50:17+5:302017-08-03T02:50:17+5:30

पिंपरी-चिंचवड शहराचे वैभव असणाºया चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर वाड्याचा विस्तार करण्यात येणार आहे. तिसºया टप्प्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

The magnificent palace extension | चापेकर वाड्याचा विस्तार

चापेकर वाड्याचा विस्तार

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे वैभव असणाºया चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर वाड्याचा विस्तार करण्यात येणार आहे. तिसºया टप्प्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा ऐनवेळेचा विषय मंजूर करण्यात आला.
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज झाली. विषयपत्रिकेवरील ३६ पैकी १४ विषय मंजूर करण्यात आले, तर अवलोकनाचे २२ विषय होते. त्यांपैकी दोन विषय तहकूब केले असून, एक विषय पुन्हा सादर करणार असून, एक विषय प्रशासनाने मागे घेतला आहे. चापेकर वाड्याच्या तिसºया टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. त्या विषयी वास्तुविशारद नियुक्तीचा ऐनवेळेचा विषय मंजूर करण्यात आला.
या विषयी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘चापेकर वाडा ऐतिहासिक वारसा असून, शहराचे भूषण आहे. स्वातंत्र्य मिळविण्यात चापेकर बंधूंचे मोठे योगदान होते. त्यांचे योगदान नवीन पिढीला समजले पाहिजे. शहरातील ऐतिहासिक वारश्याचे जतन केले पाहिजे. चिंचवडगावात क्रांतिवीर चापेकर वाडा आहे. या चापेकर वाड्याच्या तिसºया टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी कामाचे नियोजन व आराखडा करण्यासाठी किमया आर्किटेक्ट, किरण कलमदाणी यांची नेमणूक केली आहे.
प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या व यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी
त्यांना निविदापूर्व कामासाठी एक टक्का व निविदापश्चात कामासाठी १.३५ टक्के रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या सर्वच प्रभागांतील अर्थसंकल्पातील कामांबाबत सल्लागार आणि आर्किटेक्ट नियुक्तीबाबतचे विषय स्थायी समोर आणावेत, अशी सूचनाही प्रशासनास केली आहे.’’

Web Title: The magnificent palace extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.