महावितरणनेच थकवली थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:19 AM2018-07-24T01:19:46+5:302018-07-24T01:19:50+5:30

कारवाईकडे प्रशासनाचा काणाडोळा

Mahavitaran's only exhaustion | महावितरणनेच थकवली थकबाकी

महावितरणनेच थकवली थकबाकी

Next

देहूरोड : देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाने देहूरोड येथे महावितरणच्या शाखा कार्यालयासाठी दिलेल्या दोन गाळ्यांचे भाडे साडेचार वर्षांपासून थकविले असून, अखेर थकबाकी दोन लाख ३ हजार ९५६ रुपयांवर पोहोचली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. बोर्डाकडून महावितरणवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात चालढकल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने देहूरोड पोलीस ठाण्याजवळ (सेंट्रल रेस्टॉरंटशेजारी) असलेल्या बोर्डाच्या मालकीच्या एलआयजी मार्केटमधील क्रमांक पाच व दहा असे दोन गाळे १९७० पासून जुन्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळास भाड्याने दिलेले आहेत. या गाळ्यांना कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ४११ रुपये भाडे आकारण्यात येत होते. ३१ मार्च २०१२ पर्यंत भाड्यापोटी २० हजार ६५० रुपये थकबाकी होती . त्यानंतर एप्रिल ते डिसेंबर २०१२ अखेर दरमहा बोर्डाकडून ४११ रुपये भाडे आकारण्यात येत होते. मात्र, त्यानंतर बोर्डाने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार भाडेवाढ केल्यानंतर दरमहा २ हजार ८७७ भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे.

बैठका झाल्या, पण निर्णय नाहीच!
दरम्यान, महावितरण कंपनीने ११ आॅक्टोबर २०१३ रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे एकूण १० हजार २७५ रुपये जमा केल्याचे दिसत आहे. त्यानंतर भाड्याची उर्वरित रक्कम न भरल्याने जून २०१८ अखेर एकूण थकबाकी दोन लाख तीन हजार ९५६ रुपये झाली असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे . बोर्डाच्या महसूल विभागाने महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत गतवर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या एका बैठकीत सर्व थकबाकीचा पाढाच वाचून दाखवत महावितरण कंपनी वीज बिल न भरल्यास दुसºया दिवशी दंडासह रक्कम वसूल करते याची आठवण करून दिली होती.

Web Title: Mahavitaran's only exhaustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.